आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन मंजुर, पण तुरुंगातू बाहेर येऊ शकणार नाही...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयच्या विनंतीनंतर पीटर मुखर्जीच्या जामीवार 6 आठवड्यांचा स्टे आलाय

मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात मागील चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. जस्टिस नितिन सांबरे यांनी पीटर मुखर्जीचा जामीन दोन लाख रुपयांच्या गॅरंटीवर मंजुर केला. त्याच्या जामीनानंतर लगेचच सीबीआयने प्रकरणाला गांभीर्याने घेत न्यायालयाला जामीनावर स्थिगिती देण्याची विनंती केली आणि कोर्टाने ती मान्यही केली आहे. कोर्टाने सीबीआयचे म्हणने ऐकून आपल्याच निकालावर 6 आठवड्यांचा स्टे आणला आहे. याचा अर्थ जामीन मिळाल्यानंतरही पीटर मुखर्जी तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही.

या 6 आठवड्यात पीटर या स्थिगितीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयाने सुनावनी दरम्यान सांगितले की, चौकशीत पीटर मुखर्जीचा या प्रकरणात हात असल्याचे पुरावे आढळले नाहीत, त्यामुळेच हा जामीन मंजुर झाला आहे. शीना बोरा हत्याकांडात पीटर मुखर्जीला 19 नोव्हेंबर 2015 ला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याची माजी पत्नी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी आहे. 

कोणालाच भेटू शकणार नाही पीटर मुखर्जी

जस्‍टिस सांबरे यांनी आपल्या आदेशात म्हटले की, ''जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा पीटर मुखर्जी भारतात नव्हता. या प्रकरणाची सुनावनी सुरुच आहे. आरोपी मागील चार वर्षांपासून तुरुंगात बंद आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची बायपास सर्जरीदेखील झाली आहे.'' या सर्व बाबी लक्षात घेऊनच पीटर मुखर्जीला जामीन मंजुर झालाय, पण त्यावर सध्या स्टे आणलाय. या 6 आठवड्यात पीटर आपली मुलगी विधी, मुलगा राहुल मुखर्जी आणि प्रकरणाशी संबंधीत इतर साक्षीदारांशी कुठलाही संबंध ठेऊ शकणार नाहीत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.