आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी तलाक अध्यादेशाविरोधात याचिका; अध्यादेश अवैध, निरर्थक असल्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तिहेरी तलाकशी संबंधित अध्यादेशाला सामाजिक संस्था व वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राष्ट्रपतींनी बुधवारीच या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार तिहेरी तलाक अवैध मानले जाणार असून तलाक दिल्यास पतीला सुमारे ३ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल. 


या कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्यात जामिनाची तरतूदही आहे. मात्र, हा अध्यादेश अवैध, निरर्थक असल्याचा दावा रायझिंग व्हाॅइस फाऊंडेशनने केला आहे. तर, यामुळे मुस्लिम समाजातील पुरुषांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असल्याचा दावा वकील तन्वीर निझाम यांनी केला आहे. यावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...