आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथपत्रात खोटी माहिती दिली; प्रीतम मुंडेंच्या निवडीला आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवताना शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणी त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी सादर करण्यात आली आहे. 


पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी अॅड. अजित काळे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२५-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा आहे, असे नमूद करत ही याचिका दाखल करण्यात आली. मुंडेंंच्या शपथपत्रातील माहितीवरून आक्षेप घेण्यात आले आहेत. ते असे. एका मतदाराचे दोन मतदारसंघांत नाव असू नये, असा नियम आहे. पण मुंडे यांचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील ५५ व्या मतदार यादीतील ११४० क्रमांकावर नाव आहे. परळी विधानसभेच्या यादीतही त्यांचे नाव आहे. मुंडेंचे कागदोपत्री व्यवहार प्रीतम गौरव खाडे या नावाने चालतात. त्यांनी मतदारांना भावनिक मुद्द्याच्या आधारे आकर्षित करण्यासाठी वडील गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावले आहे. त्यांच्या विरोधात कोट्यवधींचे बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती शपथपत्रात नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...