Home | Maharashtra | Vidarva | Akola | Petition for victim also accused in kidney trafficking case

किडनी तस्करीप्रकरणी पीडितेलाही आरोपी करण्यासाठी याचिका

प्रतिनिधी | Update - Sep 12, 2018, 12:43 PM IST

किडनीची विक्री करणाऱ्या महिलेलासुद्धा आरोपी करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका आरोपीतर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात द

  • Petition for victim also accused in kidney trafficking case

    अकोला- किडनीची विक्री करणाऱ्या महिलेलासुद्धा आरोपी करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका आरोपीतर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. न्यायालयाने याबाबत जुने शहर पोलिसांना नोटीस बजावली असून त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.


    राज्यभर गाजलेल्या किडनी तस्करी प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी देवेंद्र सिरसाट याने न्यायालयात अॅड. एम. बी. शर्मा, विलास नाईक, संतोष सन्सासे, आशुतोष शर्मा यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी म्हटले की, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ऑर्गेन्स टिशू अॅक्ट १९९४ नुसार किडनी खरेदी करणारा व मध्यस्थी करणाऱ्यासोबतच विकणाऱ्याविरुद्ध जर न्यायालयात गुन्हा सिद्ध होत असेल तर आरोपीला १० वर्षाची शिक्षा व एक कोटी रुपयांचा दंडाची तरतूद आहे. या कलमानुसार तक्रार करणारी महिलाही तेवढीच दोषी आहे म्हणून तिलाही आरोपी करण्यात यावे, ही याचिका न्यायालयाने विचारात घेतल्यानंतर जुने शहर पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.


    ३१ डिसेंबर २०१५ रोजी जुने शहर पोलिस ठाण्यात राहूल नगरातील हरिहर पेठ येथील निवासी शांताबाई रामदास खरातने पोलिसांत तक्रार दिली होती. या त्यात आरोप होता की, आरोपी देवेंद्र सिरसाटने शांताबाई खरातला उधार पैसे मागितल्यानंतर त्याने म्हटले होत की, जर किडनी विकली तर एका किडनीच्या बदल्यात पाच लाख मिळतील, या आमिषाला बळी पळून त्याने शांताबाईची भेट बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवार याच्याशी करून दिली होती. त्यानंतर औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नांदुरा येथील झांबड यास किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र पवार व सिरसाट यांनी शांताबाई यांना पाच लाख रुपयांऐवजी तीन लाख रुपये दिले होते. आपली फसवणूक झाली म्हणून शांताबाईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरण कलम ४२०,४१७,३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. नंतर एलसीबीने तपास केल्यानंतर कलम ४६५, ४६८, ४७१, ३७० वाढवले होते.

Trending