Home | National | Delhi | Petrol 17 and diesel 16 paise cheaper;

पेट्रोल 17, डिझेल 16 पैसे स्वस्त: दरकपातीचा सिलसिला शनिवारीही कायम

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 11, 2018, 07:42 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

  • Petrol 17 and diesel 16 paise cheaper;

    नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला.

    दिल्लीत शनिवारी पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त होत ७७.८९ रुपये प्रति लिटरवर आले. डिझेलही १६ पैशांनी स्वस्त होत ७२.५८ रुपये लिटरवर आले. मुंबईतही १७ पैशांच्या दर कपातीनंतर पेट्रोल ८३.४० रुपये प्रतिलिटर झाले. डिझेल १७ पैशांनी स्वस्त होत ७६.०५ रुपये लिटरवर आले.

Trending