आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, नागरिकांना दिलासा; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमती ३५ डॉलरच्या खाली आल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. कंपन्यांनी मंगळवारी इंधन दरात कपात केली. मंगळवारी पेट्रोल ३० पैसे तर डिझेल दर २५ पैशांनी घटवले. यामुळे नाशकात पेट्रोल दर प्रति लिटर ७६.४० रुपये आणि डिझेल दर ६५.३५ रुपये झाला आहे.

जागतिक कमाेडिटी बाजारात खनिज तेलाच्या घसरणीचा लाभ भारतीयांना होत आहे. खनिज तेल स्वस्त झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पेट्रोलमध्ये ३० पैसे आणि डिझेलमध्ये प्रति लिटर २५ पैशांची घट झाली. मंगळवारी खनिज तेलाचा भाव मात्र सावरला. ब्रेंट क्रूडचा भाव ३६.६७ डॉलर प्रती बॅरलपर्यंत गेला. चीनमधील ‘काेरोना’ विषाणूमुळे खनिज तेलाच्या मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. जगभरातील तेलाची मागणी घटल्याने मागील दोन महिन्यात तेलाच्या किमती जवळपास ३० डॉलर्सने कमी झाल्या आहेत. सोमवारी कमाेडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांची घट झाली होती. यामुळे खनिज तेल उत्पादक देश धास्तावले आहेत. 

आजच्या दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव 

पेट्रोल आणि डिझेल झाले आणखी स्वस्तप्रति लिटर ७५.९९ रुपयांपर्यंत खाली आले आहे. डिझेल ६६.९७ रुपये झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोलचा भाव ७०.२९ रुपये असून डिझेलचा दर ६३.०१ रुपये आहे. बंगळुरूत पेट्रोलचा भाव ७२.७० रुपये आणि डिझेलचा भाव ६५.१६ रुपये आहे. चेन्नईतसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. आज चेन्नईत पेट्रोल दर ७३.०२ रुपये आणि डिझेल ६६.४८ रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...