आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, दिल्लीत पेट्रोलचे दर 70 रुपयांपेक्षा कमी; जाणून घ्या इतर शहरांमध्ये काय आहे पेट्रोल-डिझेल दराची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमती ढासळत असल्यामुळे स्थानिक स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होताना दिसत आहे. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने सोमवारी राजधानी दिल्ल्लीत पेट्रोलच्या किमतीमध्ये 21 पैशांनी कपात केली आहे. या कपातीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 69.86 रूपये प्रति लीटर झाले आहे. 29 मार्चनंतर आतापर्यंतची सर्वात निच्चांक स्तर आहे. 

 
अन्य शहरांची अशी आहे स्थिती 


मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 41 पैशांनी कमी करण्यात आले आहे. यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 75.48 रूपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 18 पैशांची कपात करण्यात आली आहे. यामुळे डिझेलचे दर 66.79 रूपये प्रति लीटर झाले आहेत. 

 

कोलकाता 
कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात 59 पैशांनी तर डिझेलच्या दरात 19 पैशांची कपात झाली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 71.48 रूपये आणि 65.59 रूपये प्रति लीटर झाले आहेत. 

 

चेन्नई
चेन्नई येथे पेट्रोलच्या किमतीती सर्वात जास्त 63 पैशांनी कपात करण्यात आली आहे. येथे पेट्रोलचे दर प्रति लीटर 72.48 रुपये झाले आहेत. तसेच डीझेलच्या किमतीतील सर्वात जास्त कपात येथेच झाली आहे. 20 पैशांनी ही कपात करण्यात आली आहे. यामुळे येथे डिझेलचे दर 67.38 रूपये प्रति लीटर झाले आहेत.  


कच्च्या तेलाच्या किमतीमुळे मिळतोय दिलासा

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्यामुळे देशात पेट्रोल-डीझेलच्या किमतीमध्ये दिलासा मिळत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 54.74 डॉलर प्रति बॅरेल होता. तर WTI क्रूड ऑईलचा दर 46.11 रूपये प्रति डॉलर होता. सोमवारी या दोघांच्या किमतीत गेल्या काही दिवसांपेक्षा किरकोळ वाढ दिसून आली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...