आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डीझेल महागले, मुंबईत प्रति लिटर पेट्रोलमागे 2.42 रुपयांची दरवाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. बजेट सादर होताच अनेक वस्तुच्या किमती कमी झाल्या तर काहींच्या किमती वाढल्या. यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. शनिवारपासून हे नवे दर लागू झाले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 2.45 रुपयांनी वाढला तर मुंबईत पेट्रोल 78.57 रुपये प्रती लिटर या भावाने मिळत आहे. याशिवाय कोलकातात 75.15 रुपये प्रती लिटर झाले आहे. अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर सेस आणि एक्‍साइज ड्यूटी वाढवली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर 1 रुपये प्रति लिटर सेस लावण्यात आला आहे. यासोबतच 1 रुपये प्रति लिटरच्या हिशोबाने एक्साइज ड्यूटीही वाढली आहे. सरकारसाठी पेट्रोल आणि डिझेल सर्वात मोठे कमाईचे साधन आहे.


आपण पाहतो की, कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्यावर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट होते, पण या वर्षात जागतीक स्तरावर किमती कमी झाल्या तरी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. त्यामुळेच नागरिकांना याचा फायदा होणार नाही. बजेट सादर करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी एक-एक रुपये प्रती लिटर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते तसेच पायाभूत विकास उपकर वेगळे लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यातच कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे पेट्रोलवर उत्पादन शुल्क आणि उपकरावर फेरविचार करण्याची संधी आहे.


पेट्रोल-डिझेलसहीत सोन्याच्या आयातीवरही कर वाढवला आहे, पण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी यावरील कर्जावर विशेष सुट देण्यात आली आहे. बजेटमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त कमाई असणाऱ्यांवर कर वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. आर्थिक स्तर वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांना 25 टक्के कराच्या यादीत आणले आहे. तसेच गृहकर्जावर 3.5 लाखांची सुट देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...