आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या, सर्वसामान्यांना बसणार फटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात 9 पैशांनी तर डिझेलचा दर लीटरमागे 16 पैशांनी वाढला आहे. देशाच्या राजधानीतही इंधन दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. मागील 15 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर घरसत होते, पण काल शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. 


पेट्रोल, डिझेल दरात झालेली वाढ नियमित स्वरुपाची असून त्यात काहीच चुकीचे नसल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी सांगितले आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात सरकारने कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मागील काही दिवसात इंधन कंपन्यांनी इंधनाच्या दरात फारशी वाढ केली नव्हती. या काळात झालेले नुकसान आता भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंधन दरवाढिचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. 


जागतिक इंधन बाजारातील सध्याची स्थिती फारशी चांगली नाहीये. अरब राष्ट्रांमधील तणाव, इराण, व्हेनेझुएलामधून कमी झालेला तेल पुरवठा यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळेच येत्या काही दिवसात देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लीटरमागे 5 रुपये, तर डिझेल दरात प्रती लीटरमागे 3 रुपयांची सवलत दिली होती. या सवलतीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधन कंपन्यांकडून दर वाढ केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.


सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रती बॅरलमागे 70 डॉलरहून अधिक आहे. मागच्या ऑगस्टमध्ये खनिज तेलाचा दर इतका असताना भारतात पेट्रोलचा दर 78 रुपयांच्या, तर डिझेलचा दर 70 रुपयांच्या आसपास होते. पण सध्याच्या घडीला भारतात पेट्रोल 73, तर डिझेल 67 रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाल्याने आता लवकरच इंधन दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...