आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol: पेट्रोलची पुन्हा 90च्या दिशेने घोडदौड, आज 18 पैशांनी महागले, पाहा आजचे दर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> 8 दिवसांत दिल्लीत डिझेल 2.24 रुपये, पेट्रोल 1.16 रुपयांनी महागले.

> 6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान ही वाढ झाली.
> सरकारकडून दिलासा मिळाल्याने 5 ऑक्टोबरला पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त झाले होते.
> दर सतत वाढल्याने ग्राहकांना सरकारी दिलाशाचा फायदा नाही.

 

नवी दिल्ली - पेट्रोलचे दर शनिवारी 18 पैशांनी वाढले. या वाढीनंतर दिल्लीत 82.66 रुपये आणि मुंबईत 88.12 रुपये दर झाले आहेत. दिल्लीमध्ये डिझेल 29 पैसे आणि मुंबईत 31 पैशांनी महागले. पेट्रोलच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आणि डिझेलमध्ये सलग 8व्या दिवशी वाढ झाली आहे.

 

मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल

शहर शुक्रवारचे दर (रुपये/लीटर) शनिवारचे दर (रुपये/लीटर) वाढ
दिल्ली 82.48 82.66 18 पैसे
मुंबई 87.94 88.12 18 पैसे

 

 

मेट्रो शहरांमध्ये डिझेल

शहर शुक्रवारचे दर (रुपये/लीटर) शनिवारचे दर (रुपये/लीटर) वाढ
दिल्ली 74.90 75.19 29 पैसे
मुंबई 78.51 78.82 31 पैसे

 

 

 

4 ऑक्टोबर रोजी केंद्राने पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी 1.5 रुपयांनी कमी केली होती. सरकारी निर्देशावरून तेल कंपन्यांनीही 1 रुपया कमी केला. याप्रकारे जनतेला 2.5 रुपयांचा दिलासा मिळाला होता. परंतु सतत दर वाढत असल्याने ग्राहकांना फायदा मिळत नाहीये.

 

अर्थ मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी करण्यास सांगितले जाणार नाही. दर निश्चित करण्याचे कंपन्यांना स्वातंत्र्य राहील.

 

तेल कंपन्या कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यावरून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात. ब्रेंट क्रूड 80 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले आहे. रुपया गुरुवारी 55 पैशांनी मजबूत होऊन 73.57 वर बंद झाला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...