आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Petrol Diesel Price Hiked By Rupees 3 In India As Global Oil Prices Looms News And Updates

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे ३ रुपयांची वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपन्यांनी सर्व फायदा ग्राहकांना दिला तर तर पेट्रोल ३६ रुपयांनी स्वस्त
  • तीन महिन्यांत कच्चे तेल ४८% स्वस्त, मात्र तेल कंपन्यांनी ८% किमती कमी केल्या, स्वस्ताईचा फायदा ग्राहकांना नाहीच

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तीन महिन्यांत ४८.३३ % पर्यंत घसरल्या आहेत. मात्र तेल कंपन्यांनी या काळात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल फक्त ८ टक्क्यांनी स्वस्त केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कच्चे तेल स्वस्त झाल्याचा पूर्ण लाभ सर्वसामान्यांना देण्याऐवजी स्वत:ची तिजोरी भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे प्रत्येकी ३ रुपये वाढ केली आहे. सरकारी पत्रकानुसार, विशेष उत्पादन शुल्कात २ रुपये आणि रस्ता अधिभार एक रुपयाने वाढवण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या आठ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. मात्र, या उद्योगाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, उत्पादन शुल्क वाढीने तूर्तास किरकोळ किमतीत वाढ होण्याची शक्यता नाही. हे कच्च्या तेलाच्या घसरणीसह सामावून जाईल. उत्पादन शुल्कवाढीमुळे सरकारचा महसूल वर्षाकाठी ३९ हजार कोटींवरून ४५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, पहिल्या तिमाहीत कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा बहुतांश लाभ ग्राहकांना देण्यात आला. आताच्या बिकट आर्थिक स्थितीत सरकारने महसूल वाढीसाठी उत्पादन शुल्क वाढवले आहे. विकासकामांवर खर्च करण्यासाठी याची मदत होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे ११ जानेवारीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती लिटरमागे ६ रुपयांनी कमी झाल्या आहेत. शनिवारी दिल्लीत पेट्रोल लिटरमागे ६९.८७ आणि डिझेल ६२.५८ रुपयांनी विक्री झाले.  



कंपन्यांनी सर्व फायदा ग्राहकांना दिला तर तर पेट्रोल ३६ रुपयांनी स्वस्त


कच्च्या तेलाच्या किमतीच्या हिशेबाने देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज बदलतात. एक जानेवारी २०२० ला भारतीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पिंपामागे ४,६३८ रुपये होती. १४ मार्चला किंमत पिंपामागे ४८.३३%  घटून २,३९६ रुपये झाली, तर पेट्रोलची िकंमत ८.११% नी कमी होऊन लिटरमागे ७६.०४ वरून ६९.८७ रुपयांवर आली. दरम्यान, डिझेलच्या किमतीही ७.८७ %  कमी झाल्या. कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या घसरणीचा पूर्ण लाभ ग्राहकांना दिला असता तर पेट्रोलची किंमत सुमारे ३६ रुपयांनी कमी झाली असती.




> १४ दिवसांत पेट्रोलची मूळ किंमत ४.७९ रुपयांनी घटून २८.१८ रुपयांवर आली आहे. मात्र तेल कंपन्यांनी फक्त १.८८ रुपयांचाच लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला. उर्वरित २.९१ रुपये प्रतिलिटर रक्कम कंपन्यांनी स्वत:च्या खिशात घातली.



बातम्या आणखी आहेत...