आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fuel Price Rise: मुंबई, दिल्लीत पेट्रोल पुन्हा 12 पैश्यांनी महागले; राजधानीत पेट्रोल 87.89 तर डीझेल 77.09 रुपये लिटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीत रविवारी पेट्रोल प्रति लिटर 12 पैसे महाग होऊन 80.50 रुपयांवर पोहोचले. तर मुंबईत सुद्धा 12 पैश्यांच्या वाढीसह एक लिटर पेट्रोल 87.89 रुपयांत मिळत आहे. गेल्या चार दिवसांचाच विचार केल्यास इंधनात एका रुपयाची वाढ झाली आहे. दिल्लीत डीझेल 10 पैश्यांनी महागले असून प्रति लिटर किंमत 72.61 रुपये या उच्चांकी आकड्यावर आहे. तेलाच्या किमतींत फक्त बुधवारी काहीच बदल झाले नाही. तत्पूर्वी सलग 10 दिवस इंधन दरवाढ झाली. 

 

मेट्रो शहरांत पेट्रोल

शहर शनिवारचे रेट (रुपये/लिटर) रविवारचे रेट (रुपये/लिटर) वाढ
नवी दिल्ली 80.38 80.50 12 पैसे
मुंबई 87.77 87.89 12 पैसे
कोलकाता 83.27 83.39 12 पैसे
चेन्नई 83.56 83.66 10 पैसे

मेट्रो शहरांमध्ये डीझेल

शहर शनिवारचे रेट (रुपये/लिटर)

रविवारचे रेट (रुपये/लिटर)

वाढ
नवी दिल्ली 72.51 72. 61 10 पैसे
मुंबई 76.98 77.09 11 पैसे
कोलकाता 75.36 75.46 10 पैसे 
चेन्नई 76.66 75.75 09 पैसे 

 

 

बातम्या आणखी आहेत...