आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात पेट्रोल प्रति लि. ३.३४, डिझेल ४.२२ ने महाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अकाेल्यातही दिवसेंदिवस वाढतच हाेत असल्याचे गत तीस दिवसांच्या अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. ९ अाॅगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत पेट्राेल ३ रुपये ३४ पैसे, तर डिझेल ४ रुपये २२ पैशांनी महागले. त्यामुळे सलग वाढणाऱ्या इंधन दराच्या वाढीत आज तरी खंड पडेल आणि किंमत स्थिर किंवा कमी होतील , अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरत अाहेत. 

 

सप्टेंबरच्या नऊ दिवसात तर पेट्रोल १ रुपये ७६ पैशांनी तर डिझेल २ रुपये २४ पैशांनी वाढले अाहे. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेने डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ हाेत असल्याने येणाऱ्या काही दिवसात महागाई अाणखीच भडकणार असल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे. याच इंधन दरवाढीच्या विरोधात कांॅग्रेसतर्फे साेमवारी बंदची हाक देण्यात अाली असून, बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात अाल्या अाहेत. गत काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत अाहेत. अकाेल्यात रविवारी पेट्राेलचे दर ८७.९७ (प्रती लिटर रुपये) तर, डिझेलचे दर ८२.४३ रुपये हाेते. याचा परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दरांवर हाेत अाहे. परिणामी गृहिणींचेही बजेट कोलमडले. राज्य सरकार पेट्रोलवर स्थानिक कर लावत असून, याचा फटका सामान्यांना सहन करावा लागत अाहे. 


गत तीस दिवसात १४ दिवस हाेते दर स्थिर
९ अाॅगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत केवळ १४ वेळा पेट्रोलचे दर स्थिर हाेते. ११ व १२ अाॅगस्ट:- ८४.८०, १३ ते १५ अाॅगस्ट:- ८४.७१, १६ ते १७ अाॅगस्ट:-८४.७६, २१ ते २३ अाॅगस्ट:-८५.१४, २४ ते २५ अाॅगस्ट:-८५.२२ आणि ४ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या दिवशी पेट्रोलचे दर ८६.८० प्रती लिटर हाेते. 


शाळांबाबत प्रशासनाचे अादेश नाही : बंदच्या अनुशंगाने शासकीय शाळांबाबत प्रशासनाकडून अादेश नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी स्पष्ट केले. काही खासगी शाळा, काॅन्व्हेंट, इंग्रजी शाळांनी शाळा बंदचे निराेप पाठवले अाहेत. 


सिलिंडरचे दर वाढतेच : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून पेट्रोल व डिझेलच्या दरात नेहमीच वाढ होत आहे. गत वर्षभरात गॅसच्या किंमती जवळपास १९ पेक्षा जास्त वेळा वाढल्या अाहेत.२०१४पूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे दर ४०० रुपये हाेते, हेच दर अाज दर ८५० पर्यंत पाेहाेचले अाहेत. 


राजकीय पक्षांचा पाठिंबा : इंधन दरवाढ, घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढ झाल्याने साेमवारी काँग्रेसतर्फे पुकारलेल्या बंदमधून दुध, पाणी, वीज, आराेग्य यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळल्या अाहेत. बंदला डाव्या पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी पाठिंबा दिला अाहे. 


दरवाढीचे कारणं अन् दावेही 
- सन २०१४मध्ये माेदी सरकार सत्तेत अाले तेव्हा कच्चा तेलाचे प्रती बॅरल दर १०७ डाॅलर हाेता. मात्र अाता हाच दर ७३ रुपये प्रती बॅरल अाहे. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात पेट्रोल ७० रुपये , डिझेल ५५ प्रती लिटर हाेते. मात्र अाता पेट्रोल ८७.९७ पैशांवर पाेहाेचले. 

- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने इंधन दरात वाढ होत असल्याचे तेल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची होणारी घसरण हेही यामागचे कारण असल्याचा दावा करण्यात येत अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...