आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यात परभणीत पेट्रोल सर्वाधिक महाग; पेट्रोल 89 रुपये 24 पैसे तर डिझेल 77.13 रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. राज्यातील विविध शहरांत वेगवेगळ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच होरपळून निघाले आहेत. शुक्रवारी सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे परभणीत विकले जात होते. जिल्ह्यात पेट्रोल हे ८९.२४ रुपये तर डिझेल ७७.१३ पैशांनी नागरिकांना खरेदी करावे लागले आहे. त्यामुळे परभणीकरांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 


परभणी शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवरून आज पेट्रोल ८९. २४ पैसे, डिझेल ७७. १३ तर भारत पेट्रोलियमच्या पंपांवर हेच पेट्रोल ८९. २७ आणि डिझेल ७७. १५ रुपये, इंडियन ऑइल पेट्रोल ८९. १६, डिझेल ७७. ०४ प्रति लिटरने परभणीकरांना खरेदी करावे लागत आहे. जे राज्यभरातील सर्वच शहरांच्या मानाने सर्वात जास्त आहे. 


ही इंधन दरवाढ रोजच होत असल्याने याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत अाहे. त्यामुळे वाहतुकीचे दरही वाढवले जात आहेत. जे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने ही इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करत परभणीकरांनी यावर संताप व्यक्त केला. दरम्यान, आजही इंधन महाग झाले आहे. पेट्रोलचे दर ४८ पैशांनी तर डिझेल ५६ पैशांनी वाढले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी आज ८७ रुपये ४५ पैसे मोजावे लागत आहेत, तर डिझेल ७६ रुपये ५७ पैसे लिटर आहे.
  

बातम्या आणखी आहेत...