आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल दर ४८ पैशांची तर डिझेल दरात ५२ पैशांची वाढ; गेल्या चौदा महिन्यांतील उच्चांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि दुसरीकडे भारतीय रुपयाचे होत असलेले अवमूल्यन या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचे दर शुक्रवारी वाढून नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. दिल्लीत पेट्रोल ८०.०५ रुपये लिटर, तर मुंबईत ८७.३९ रुपयांवर गेले आहे. शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ४८, तर डिझेलच्या दरात ५२ पैशांची वाढ केली.

 

गुरुवारी हीच वाढ अनुक्रमे २० व २१ पैसे होती. बुधवारी दोन्ही दर स्थिर राहिले होते. चेन्नई आणि कोलकात्यात हे दर अनुक्रमे ८३.१३ आणि ८२.८८ रुपये झाले आहेत. गेल्या १४ महिन्यांतील दरवाढीचा हा उच्चांक आहे. डिझेलचे दरही चढेच राहिले. दिल्लीत डिझेल ७२.०७ रुपये, कोलकात्यात ७४.९२, तर मुंबईत ७६.५१ रुपये झाले आहेत.


वाहतूक खर्च वाढल्याने महागाई वाढण्याचा धोका
गेल्या महिन्यापासून या इंधनांच्या दरात वाढ सुरू असून यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाहतुकीचा खर्च वाढणार असल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंसह फळे व भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. भारतात कोणत्याही वस्तूच्या किमतीमध्ये वाहतुकीचा खर्च १३-१५ टक्के आहे. जागतिक पातळीवर ही सरासरी केवळ ६ टक्के आहे.


काही वस्तूंच्या किमती वाढल्या
पेट्रोल-डिझेलची दरवाढ व रुपयाचे अवमूल्यन झाल्याने साबण, पेस्ट, टीव्ही-फ्रिजसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती काही कंपन्यांनी वाढवल्या, काही कंपन्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.


इतक्यात दिलासा मिळणे अशक्यच
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार इंधनावरील कर कमी करणार नाही, असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. त्यामुळे इतक्यात या दरवाढीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...