Home | National | Delhi | Petrol price increase by 20 paise, diesel 21 paise

इंधनाने गाठला आजवरचा सर्वात उच्चांक; पेट्रोल २० पैसे, डिझेल २१ पैशांनी झाले महाग

वृत्तसंस्था | Update - Sep 07, 2018, 06:40 AM IST

पेट्रोल आिण डिझेलच्या दरात होत असलेली वाढ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर २० पैशाने महागून ७९.५१ वर

  • Petrol price increase by 20 paise, diesel 21 paise

    नवी दिल्ली- पेट्रोल आिण डिझेलच्या दरात होत असलेली वाढ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर २० पैशाने महागून ७९.५१ वर पोहोचला, तर डिझेल २१ पैशांनी वाढून ७१.५५ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर आजवरच्या उच्चांकी म्हणजे ८६.९१ रुपयांवर पोहोचला.


    काँग्रेसचा १० तारखेला ‘भारत बंद’
    डॉलरच्या तुलनेत गडगडता रुपया व वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरुद्ध काँग्रेसने १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी ही माहिती दिली. काँग्रसचे सरचिटणीस अशोक गहलोत म्हणाले, सरकारला झोपेतून उठवण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

Trending