आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Fuel Price: दिल्ली-मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा 14 पैश्यांनी महागले, मायानगरीत 87 रुपये प्रति लिटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - पेट्रोल-डीझेलच्या दरांमध्ये रविवारी पुन्हा वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 14 पैश्यांनी महागले. दिल्लीत पेट्रोल 81.82 रुपये लिटर आणि डीझेल 29 पैश्यांनी वाढीसह 73.53 रुपये इतके झाले आहे. तर दुसरीकडे, मुंबईमध्ये पेट्रोल 87.29 रुपये आणि डीझेल 31 पैश्यांच्या वाढीसह 77.06 रुपये प्रति लिटर पोहोचले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी केले. त्यानंतर शनिवारी मुंबईत पेट्रोल दरांत 70 पैशांची घसरण झाली होती. 


शुक्रवारी 5 रुपयांनी स्वस्त झाले होते पेट्रोल 
केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल-डीझेलमध्ये 1.5 रुपयांची एक्साइज ड्युटी कमी केली. तेल कंपन्यांना सुद्धा एका रुपयाने  आणि राज्य सरकारांना 2.5 रुपयांनी दर कपात करण्यास सांगण्यात आले होते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी ही अपील मान्य करत पेट्रोलचे दर कमी केले. त्यामुळे, लोकांना शुक्रवारी पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त मिळाले. परंतु, दिल्लीने इंधन दरांत कपात केली नसल्याने तेथे फक्त 2.5 रुपयांचा फरक पडला. ऑगस्ट महिन्यापासूनच पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे. 4 ऑक्टोबर रोजीच मुंबई पेट्रोलचे दर 91.34 रुपये प्रति लिटर पोहोचले होते.

 

मेट्रो शहरांत पेट्रोलचे दर

 

शहर शनिवारचे रेट (रुपये/लिटर) रविवारचे रेट (रुपये/लिटर) वाढ
नवी दिल्ली 81.68 81.82 14 पैसे
मुंबई 87.15 87.29 14 पैसे

 

मेट्रो शहरों में डीजल

शहर शनिवारचे रेट (रुपये/लिटर) रविवारचे रेट (रुपये/लिटर) वाढ / कपात
नवी दिल्ली 73.24 73.53 29 पैसे वाढ
मुंबई 76.75 77.06 31 पैसे कपात

 

 

बातम्या आणखी आहेत...