आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षात 15 रुपयांनी स्वस्त होईल पेट्रोल; सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नववर्षामध्ये पेट्रोल मोठ्या प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2019 मध्ये सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पेट्रोल स्वस्त होणार आहे. 2019 मध्ये पेटोल-डिझेल प्रति लीटरमागे 5 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय सरकारकडून मिथेनॉलयुक्त पेट्रोल विकण्याची परवानगी मिळताच पेट्रोल-डिझेल 10 ते 15 रुपयांनी स्वस्त होऊ शकते.

 

क्रूड ऑइलच्या किंमतीत 71 टक्क्यांची घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण सुरू असून बुधवारी क्रूड ऑइल 50 डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात होते. 2 ऑक्टोबर 2018 मध्ये क्रूड ऑइल 85.6 डॉलर प्रति बॅरलदराने विकले जात होते. तेव्हापासून आजपर्यंत कच्या तेलाच्या दरांत घट होवून जवळपास 71 टक्क्यांची घसरण झाली आहे.  
 
पेट्रोलच्या किंमतीत 20 टक्क्यांची घसरण
2 ऑक्टोबर 2018 ला दिल्लीत पेट्रोल 83.80 रुपये प्रति लीटर दराने होते. तर सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने आज दिल्लीत पेट्रोल 69.74 रुपये प्रति लीटर आहे. 2 ऑक्टोबरच्या तुलनेत आज पेट्रोल 20 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत अशीच घसरण सुरू राहीली तर पेट्रोल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

 

मिथेनॉलयुक्त पेट्रोलच्या चाचण्या सुरू, यशस्वी झाल्यास पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त
काही महिन्यांपूर्वी निती आयोगाने केंद्र सरकारला पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळण्याचा सल्ला दिला होती. त्यानंतर सरकारने पुण्यात चाचण्याही सुरू केल्या आहे. जर चाचणी यशस्वी झाली तर पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...