आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 10 व्या दिवशीही पेट्रोलच्या दरांत घसरण; पेट्रोल प्रतिलीटरमागे 10 रुपयांनी तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त...जाणून घ्या आजच्या किंमती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अचानक घट झाल्याने सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 72.53 रुपये आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये 17 ऑक्टोबरपासून आतापर्यंत प्रतिलीटरमागे 10 रुपये 30 पैसे घट झाली आहे. चेन्नईमध्ये प्रतिलीटर पेट्रोलमागे 10 रुपये आणि मुंबईमध्ये 9 रुपये 99 पैशांची घट झाली आहे.

 

शनिवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट

गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने सलग 10 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटरमागे 6 रुपये 54 पैसे आणि डिझेल 6 रुपये 43 पैशांनी स्वस्त झाले आहे. तेल वितरण कंपन्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांत प्रतिलीटरमागे 34 पैशांची घट केली आहे. तर हेच दर कोलकाता शहरात 33 पैसे आणि चेन्नईत 36 पैशांनी कमी झाले आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरांत प्रतिलीटरमागे दिल्लीत 37 पैसे, कोलकाता शहरात 49 पैसे आणि मुंबईमध्ये 39 पैशांची कपात झाली आहे. 

 

इंडियन ऑईल कंपनीच्या वेबसाइटनुसार आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव 

> दिल्ली
पेट्रोल- 72.53 रुपये
डिझेल- 67.35 रुपये

 

> कोलकाता
पेट्रोल- 74.55 रुपये
डिझेल- 69.08 रुपये

 

> मुंबई
पेट्रोल- 78.09 रुपये
डिझेल- 70.50 रुपये

 

> चेन्नई
पेट्रोल- 75.26 रुपये
डिझेल- 71.12 रुपये

 

> नाशिक
पेट्रोल- 75.26 रुपये
डिझेल- 71.12 रुपये 

 

> कोल्हापूर
पेट्रोल - 80.01 रुपये 
डिझेल - 71.04 रुपये 

 

> नागपूर
पेट्रोल- 79. 62 रुपये
डिझेल- 71.03 रुपये

 

> औरंगाबाद
पेट्रोल- 80.81 रुपये
डिझेल- 73.33 रुपये 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 59.19 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआयचे भाव 50.70 डॉलर प्रतिबॅलर आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरांत होणारी घसरण कायम सुरु असल्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलच्या दरांत येत्या काही दिवसांत आणखी कपात होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...