आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा थैमान, कल्याणमधील पेट्रोल पंप गेला पाण्याखाली, 100 लोक अडकल्याची भीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- मुंबईसह महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. उल्हास नदीला पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.


याच पावसामुळे कल्याणमधील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 लोक अडकल्याची समोर आली आहे. या पेट्रोल पंपावरील गाड्याही पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. दरम्यान या ठिकाणच्या रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.


दरम्यान या लोकांच्या बचावासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आर्मी आणि एअर फोर्सची मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे.


महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्याखाली
पावसाची फटका महालक्ष्मी एक्सप्रेसलाही याचा बसला आहे. बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर ते वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले होते, त्यातील अनेकांना वाचवण्यात आले असून, एनडीआरएफचे जवानांचे बचावकार्य अद्याप सुरुच आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...