Home | Maharashtra | Kokan | Thane | petrol-rate-in-thane

ठाण्यात पेट्रोल स्वस्त होणार !

divya marathi team | Update - May 22, 2011, 11:05 AM IST

मुंबई पेट्रोलची वाढलेली किंमत आणि त्यापाठोपाठ आलेले महागाईचे संकट यामुळे त्रासलेल्या ठाणेकरांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

  • petrol-rate-in-thane    मुंबई पेट्रोलची वाढलेली किंमत आणि त्यापाठोपाठ आलेले महागाईचे संकट यामुळे त्रासलेल्या ठाणेकरांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मनपाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यास ठाणे मनपाच्या क्षेत्रात पेट्रोल स्वस्त होईल.    मनपाने ठाण्यात पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावर लागू होणार्या सध्याच्या जकात करामध्ये कपात सुचवणारा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या प्रस्तावात पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावर सरसकट फक्त अर्धा टक्का जकात लागू करण्याची सूचना आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. ती परवानगी मिळाली तरच हा प्रस्ताव अमलात येईल आणि ठाणे मनपा क्षेत्रामध्ये पेट्रोल स्वस्तात उपलब्ध होईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.Trending