आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दरामध्ये इतक्यात दिलासा नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोलियम पदार्थांवरील कर कमी करण्याची मागणी एकिकडे जोर धरत असताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी या दरांबाबत इतक्यात दिलासा मिळणार नसल्याचे संकेत दिले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड अिस्थरता आहे. त्यामुळे केवळ काही प्रमाणात दर कमी करू होणार नाही, असे प्रधान म्हणाले.

 

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये इतका चढ-उतार आहे की, केंद्र सरकारने उत्पादन शुल्क आणि राज्यांच्या मूल्यवर्धीत (व्हॅट) कराबाबत उपाययोजना केली तरी त्याचा परिणाम काही दिवसांतच कमी होईल, असे ते म्हणाले. पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. जनतेला यातून दिलासा मिळावा म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही प्रधान यांनी नमूद केले.

 

 

बातम्या आणखी आहेत...