Home | Maharashtra | Pune | Pets will leave the zoos in the open cage in Katraj Pune

प्राणीप्रेमींना मिळणार वाघाच्या चारही बछड्यांना पाहण्याची संधी, कात्रज प्राणिसंग्रहालयातून बछडे खुल्या पिंजऱ्यात सोडणार

प्रतिनिधी | Update - Mar 05, 2019, 05:44 PM IST

बछड्यांना नावाने हाक मारली की कान टवकारत ती पिंजऱ्याच्या दाराजवळ येतात...

  • Pets will leave the zoos in the open cage in Katraj Pune

    पुणे- कात्रज प्राणीसंग्रहालयातील रिद्धी वाघिणीचे चारही बछडे लवकरच प्राणीप्रेमींना पाहता येणार आहेत. पिल्लांची वाढ उत्तम होत असून, ते अतिशय खेळकर वातावरणात वाढत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून पिल्लांना खुल्या मोठ्या पिंजऱ्यात सोडले जाणार आहे. त्यानंतर प्राणीप्रेमींना या बछड्यांच्या क्रीडा पाहता येतील.

    कात्रज प्राणीसंग्रहालयातील रिद्धी आणि बगिराम या वाघांच्या जोडीला पाच महिन्यांपूर्वी चार पिल्ले झाली. त्यामध्ये तीन पिल्ले नर असून, एक मादी बछडा आहे. या पिल्लांचा नामकरण सोहळा पुण्याच्या ममहापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौरांनीच त्यांना कौतुकाने आकाश, सार्थक, गुरू आणि पौर्णिमा अशी नावे दिली आहेत.

    प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही बछडे खूपच मस्तीखोर आणि खेळकर आहेत. सतत एकमेकांच्या अंगावर उड्या मारणे, पंजे उगारणे, पिंजऱ्याच्या जाळ्यांवर चढण्याचा प्रयत्न करणे, पिंजऱ्यातल्या पाण्याच्या कुंडात डुबक्या मारणे, पंजाने पाणी उडवणे, एकमेकांवर गुरकावणे. एकमेकांच्या शेपट्या पकडणे..असे खेळ ही पिल्ले दिवसभर खेळतात. पिल्लांना दिवसातून दोन वेळा मांस, अंडी असा आहार दिला जातो. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणीही केली जाते. बछड्यांचे वजन, उंची वयानुसार योग्य प्रमाणात आहे. त्यांच्या नावाने हाक मारली की कान टवकारत ती पिंजऱ्याच्या दाराजवळ येतात...पिल्ले पाच महिन्यांची झाली, की त्यांना खुल्या मोठ्या पिंजऱ्यात सोडले जाईल. त्यानंतर प्राणीप्रेमी मंडळी त्यांना पाहू शकतील.

Trending