आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या योजनेअंतर्गत मिळणारी पेंशनची रक्कम होणार दुप्पट; जाणून घ्या कसा घेता येईल स्कीमचा लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस स्पेशल - पेंशन फंड रेग्युलेटरी विभाग PFRDA ने अटल पेंशन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनाची रक्कम वाढवून 10,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत नियामक पोर्टफोलिओच्या व्हॅल्युएशनची तपासणी करत आहे. यापूर्वी अटल पेंशन योजनेत पेंशनची रक्कम 5,000 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव होता.

 

पेंशनमध्ये 10 हजारांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

अटल पेंशन योजना एक महत्त्वाची योजना आहे. यात वेळेवर पेंशन मिळावी यासाठी बोर्ड आपल्या पोर्टफोलिओ व्हॅल्युएशनची तपासणी करत आहे. हे व्हॅल्युएशन झाल्यानंतरच वाढीव पेंशन देण्याचा निर्णय होऊ शकतो. PFRDA चे अध्यक्ष हेमंत काँट्रॅक्टर यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत पेंशनची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. डिसेंबरपर्यंत नियामकाचे पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन पूर्ण होईल. यासंदर्भातील निर्णयाची घोषणा फेब्रुवारीपर्यंत केली जाऊ शकते. 

 

अर्थ मंत्रालयाने सादर केला प्रस्ताव

अर्थ मंत्रालयाने जून महिन्यात पेंशन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पेंशनची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सध्या PFRDA योजनेअंतर्गत 1000 ते 5000 रुपयांपर्यंतचे पेंशन देण्याची तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...