आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालिंथोर्पे - इंग्लंडमध्ये 6 महिन्यांपूर्वी झालेल्या एका भारतीय महिलेच्या हत्येप्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात याआधी नवऱ्याने लूटमार आणि पत्नीच्या हत्येची गोष्ट रचवली होती. पण काही दिवसांतच पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले. पुराव्यांच्या आधारावर नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महिलेचा पती गे असून त्याने ही बाब पत्नीपासून लपवल्याचा खुलासा झाला आहे. पतीने 18 कोटी रूपयांच्या लाइफ इन्शुरन्सचा फायदा घेण्यासाठी आणि आपल्या गे पार्टनरसोबत ऑस्ट्रेलियामध्ये सेटल होण्यासाठी पत्नीचा खून केला.
पोलिसांना नवऱ्यावर होता संशय
> हे भारतीय जोडपे वेस्ट यॉर्कशायरमधील लिंथोर्पे येथे राहत होते आणि मिडल्सब्रो भागात मेडीकल चालवत होते. मितेश पटेलने 14 मे 2018 रोजी राहत्या घरी चोरी आणि पत्नी जेसिकाचा खून झाल्याचे पोलिसांना फोन करून सांगितले होते.
> कुटूंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी मितेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. पण पोलिसांना मात्र त्याच्यावर संशय होता. पोलिसांनी घटनेच्या काही दिवसानंतरच मितेशला बेड्या ठोकल्या.
> कोर्टात वकीलाने आरोप केला की, मितेशने टेस्कोच्या बॅगच्या बेल्टने जेसिकाची गळा आवळून हत्या केली आणि असे दर्शविले की, एखाद्या अज्ञात व्यक्तीने लुटमार करून जेसिकाचा खून केला.
> मितेशने जेसिकाची हत्या केल्यानंतर इमरजन्सी नंबरवर कॉल करून मदत मागितली होती. त्याने सांगितले होते की, घरी पोहोचल्यानंतर जेसिका अचेत पडली असून तिच्यावर कोणीतरी हल्ला केला आहे.
> कोर्टामध्ये इमरजन्सी नंबरवर केलेल्या कॉलची रेकॉर्डिंग ऐकवण्यात आली. सोबतच संपूर्ण घटनेचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले.
गे असल्याची गोष्ट पत्नीपासून लपवली
> कोर्टाच्या सुनावणीमध्ये मितेश गे असल्याचा असल्याचा आणखी एक खुलासा करण्यात आला. तसेच तो रोज गे डेटिंप अॅपचा वापर करत होता. याबाबत जेसिकाला काहीच माहीत नव्हते. मितेशची कझन गायत्री पटेल, फार्मसी कस्टमर साराह उरविन आणि त्याच्या मित्राने या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
> वकीलाने या सर्व गोष्टींच्या आधारावर कोर्टात सांगितले की, मितेशला ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या गे पार्टनरसोबत नवीन आयुष्याची सुरूवात करायची होती. त्यामुळे त्याने जेसिकाला आपल्या मार्गातून बाजूला केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.