आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्सच्या मुलीचे जडले भारतीय मुलावर प्रेम, फेसबुकवर झाली होती मैत्री; दोघांनी मंदिरात केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोहरपूर (झारखंड)  -  असे म्हणतात की प्रेमात विश्व लपलेले असते. प्रेम जात-पात किंवा धर्म काहीही पाहत नाही. बहुतेक याच कारणामुळे साता समुद्रापलिकडील फिलिपाइन्सची 30 वर्षीय जेनेलिन बेरोनिलाला झारखंडमधील मनोहरपूर सारख्या शहरातील उन्धन या छोट्या गावातील 27 वर्षीय तरुणासोबत विवाहबंधनात अडकली. या दोघांच्या मिलनामध्ये फेसबुकचा मोठा वाटा आहे. 

6 मे रोजी कोलकाताच्या एक शिव मंदिरात दोघांचा हिंदू रीति-रिवाजाने विवाह पार पडला. तर उन्धनमध्ये इतर औपचारिकता पूर्ण हिंदू रीति-रिवाजानुसार पूर्ण करण्यात आली. आपल्या घरात फॉरेनची सून आल्याने दीपकचा पूर्ण परिवार आनंदात आहे. 


दोन वर्षापू्र्वी फेसबुकवर वाढली जवळीक

दीपक ओमानच्या ग्लोबल रेस्तरॉ ग्रुपचा स्टोर मॅनेजर आहे. तर फिलिपाइन्सची निवासी जेनेलिन देखील ओमानच्या सलाला शहरात पर्सन नर्सिंगची नोकरी करते. 2017 मध्ये दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. चॅटिंगने गप्पा मारण्याचा सिलसिला सुरू झाला. यानंतर सुटीच्या दिवशी दोघेही एकमेकांना भेटत असे. यादरम्यान दोघांनी एकमेकांना समजून घेतले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


जेनेलिनला भारतात येण्यासाठी करावा लागला अडचणींचा सामना 
जेनेलिनला लग्नासाठी भारतात येण्यासाठी कागदोपत्री प्रक्रियेमुळे बऱ्याच अडचणी आल्या फिलिपाइन्स विमानतळावर तिला अडवण्यात आले होते. यानंतर 8 तासांचा प्रवास करून ती मलेशियाला गेली आणि तेथून कोलकात्यात दाखल झाली. 


आता भारताचे नागरिकत्व मिळविण्यसाठी करणार प्रयत्न 
जेनेलिनच्या नागरिकत्वाबाबत दीपक आणि त्याच्या परिवार प्रयत्न करत आहेत. आवश्यकता पडल्यास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागणार असल्याचे दीपकने सांगितले. आता नवविवाहित जोडपे उन्धनमध्ये राहणार असून नवीन करिअरची सुरूवात करणार आहेत. माहितीनुसार जेनेलिन चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. तिचे वडील फिलिपाइन्समध्ये एक सामान्य शेतकरी आहेत. तर दीपकचे वडील शिक्षक आहेत. फॉरेनची सून जेनेलिनमुले आम्ही सर्व आनंदीत असल्याचे दीपकच्या कुटुंबीयांनी सांगितले.