आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी एकानंतर-एक 5 तरुणींना स्टेजवर बोलावले; सर्वांसमोर कुणाला गालावर तर कुणाला ओठांवर केले Kiss

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओंवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी भर सभेत एकानंतर-एक 5 तरुणींना स्टेजवर बोलावले. यानंतर त्या सर्वांना गालावर आणि ओठांवर चुंबन दिले. या दरम्यान त्या तरुणी भयभीत दिसून आल्या. काहींचे तर डोळे पाणावले होते. हे कृत्य त्यांनी नुकतेच आपल्या परराष्ट्र दौऱ्यात केले आहे. त्यामुळे संपूर्ण घटनेचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी थांबले होते. एवढेच नव्हे, तर या दरम्यान त्यांनी समलैंगिकांवर सुद्धा वादग्रस्त विधान केले आहे.


कुणाला गालावर तर कुणाला Lip Kiss
फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते नुकतेच जपानच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी जपानमध्ये असलेल्या फिलिपाइन्सच्या नागरिकांशी संवाद साधला. या खास कार्यक्रमात जपानमध्ये काम करणारे आणि राहणारे फिलिपीनो उपस्थित होते. कार्यक्रमाचे भाषण संपल्यानंतर त्यांनी अचानक एका तरुणीला स्टेजवर बोलावले. यानंतर तिला किस करण्यास सांगितले. यानंतर दुसऱ्या तरुणीला सुद्धा यासाठीच स्टेजवर बोलावून घेतले. सीएनएनच्या वृत्तानुसार, अतिशय घाबरलेल्या या तरुणीने राष्ट्राध्यक्षांना गालावर किस हवाय की लिप किस अशी विचारणा केली. त्यावर राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ओठांवर बोट ठेवून इशारा केला. अशाच प्रकारे त्यांनी एकूण 5 तरुणींना एकानंतर एक स्टेजवर बोलावून कधी गालावर तर कधी ओठांवर किस केले. यापैकी एका महिलेने तर राष्ट्राध्यक्षांसोबत किस करताना सेल्फी देखील घेतला. त्यामध्ये वादग्रस्त नेते तिचा हात धरून थांबलेले दिसून आले.


सुंदर महिलांनीच मला समलैंगिक होण्यापासून बरे केले...
रॉड्रिगो दुतेर्ते एवढ्यातच थांबले नाहीत. त्यांच्या देशातील खासदारांमध्ये एक समलैंगिक आहे. जपान दौऱ्यात फिलिपिनो समुदायाला संबोधित करताना त्यांनी संबंधित नेत्याचे नाव घेऊन टीका केली. यानंतर एका महिलेला किस करून म्हणाले, याच सुंदर महिलांनी मला समलैंगिक होण्यापासून बरे केले. दुतेर्ते चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा 31 मे रोजी संपला. यापूर्वीही आपल्या जाहीर कार्यक्रम आणि दौऱ्यांमध्ये महिलांना किस करताना दिसून आले आहेत. त्यांनी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना अतिशय गलिच्छ शब्दांत शिवीगाळ केली होती.