आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! 75 पेक्षा अधिक लग्झरी स्पोर्ट्स कार आणि बाईक्सचा चेंदामेंदा... जाणुन घ्या कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हीडिओ डेस्क- फिलिपाइन्स देशात बुल्डोझरने 75 पेक्षा जास्त लक्झरी स्पोर्ट्स कार आणि बाईक्सचा चेंदामेंदा करण्यात आला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार फिलिपाइन्सचे राष्ट्रपति रोड्रिगो ड्युटेर यांच्या उपस्थितीत सुरू होता. या सर्व गाड्या तस्करीच्या असुन फिलिपाइन्स सरकारने देशाच्या सिमेवरुन या गाड्यांना जप्त केले होते.

 

सोमवारी सरकारद्वारा नष्ट केलेल्या या 75 गाड्यांमध्ये लॅम्बोर्गिनीस, मस्टँग आणि पोर्शे कंपनींच्या कारचा आणि 10 बाईक्सचा समावेश होता. या सर्व गाड्यांची किंमत जवळपास 210 कोटी रुपये आहे. देशातील अवैध तस्करी बंद करण्यासाठी या लक्झरी गाड्यांना चिरडण्यात आले. राष्ट्रपति रोड्रिगो ड्युटेर यांनी याअगोदरही असे सार्वजनिक स्टंट केले होते. 2016 मध्ये ड्युटेर निवडून आल्यानंतर फिलिपाइन्स देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...