आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनेश फोगाटला मिळाले ऑलिंपिकचे तिकीट, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्ज मेडलपासून एक पाऊल दूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- कुस्तीपटू विनेश फोगाटने बुधवारी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या 53 किलो कॅटेगरीमध्ये सराह हिल्डब्रँड्टला 8-2 च्या फरकाने हरवून आपले टोक्यो ऑलिंपिकचे तिकीट मिळवले आहे. यासोबतच तिने ब्रॉन्ज मेडल प्ले-ऑफसाठी क्वालिफायदेखील केले आहे.  ब्रॉन्जसाठी तिचा पुढील सामना जर्मनीच्या मारिया प्रेवोलारकीसोबत होईल.
विनेशने पहिल्या राउंडमध्ये स्वीडनच्या सोफियाला 13-0 च्या फरकाने तर प्री-क्वार्टर फायनलमध्ये जापानच्या मायु मुकायदाला 0-7 या फरकाने हरवले. प्री-क्वार्टर जिंकून मुकायदा फायनलमध्ये पोहचली, तर विनेशला रेपचेज राउंडमध्ये जागा मिळाली. या सामन्यापूर्वी विनेशला ब्रॉन्ज मेडल जिंकण्यासाठी तीन, तर टोक्यो ऑलिंपिकचे तिकीट मिळवण्यासाठी दोन बाउट जिंकावे लागणार होते.

बातम्या आणखी आहेत...