आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली- स्मार्टफोन बनवणारी कंपनी Vivo India ने भारतात दोन टप्यात 7000 कोटींची इनंव्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्याततील फॅक्ट्रीसाठी Vivo India ला यमुना एक्सप्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA) ने गौतम बुद्ध नगरमध्ये फॅक्ट्री लावण्यासाठी 169 एक्कर जमीन दिली आहे. या जमीनीवर 3,500 कोटींची इनंव्हेस्टमेंट कंपनी करणार आहे. या फॅक्ट्रीमुळे अंदाजे 25 हजार लोकांना नोकरी मिळेल. यामधील 30 टक्के नोकऱ्या या भारतीयांना दिल्या जातील पण या नोकऱ्या त्यांची शैक्षणिक आणि बौद्धिक पातळी पाहून दिल्या जातील.
सध्या Vivo किरायावर चालवत आहे फॅक्ट्री
प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणवीर सिंग यांनी सांगितले की, Vivo सध्या ग्रेटर नोएडामध्ये एक फॅक्ट्री किरायावर चालवत आहे, जिथे वर्षाकाठी 24 लाख मोबाईल बनतात. त्यामुळे कंपनी विस्ताराचा विचार करून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ही जमीन घेतल्याचे त्यांनी सांगितले. यात पहिल्या टप्यात 3,500 कोटींची गुंतवणुक केली जाईल, त्यामधून 25 हजार लोकांना रोजगार मिळेल.
दुसऱ्या टप्यात 15 हजार जॉब
कंपनी विस्ताराच्या दुसऱ्या टप्यात 200 एकर जमीनीची आवश्यकता आहे. यात अंदाजे 3,500 कोटींची गुंतवणुक केली जाईल, त्यामधून 15 हजार लोकांना रोजगार मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.