Home | National | Other State | Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

Bandit Queen च्या आई-बहिणीवर उपासमारीची वेळ, तर पती आहे पेट्रोल पंपाचा मालक; वाचा सध्या काय करत आहेत फूलनदेवीचे कुटुंबीय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 10, 2018, 12:08 AM IST

बॅन्डिट क्वीन फुलनदेवीची 10 ऑगस्ट रोजी जयंती आहे.

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  फूलनदेवी... नाव घेतल्या बरोबर डोळ्यासमोर चित्र उभे राहाते ते खाकी कपड्यांमध्ये हातात बंदूक घेतलेली आणि डोक्याला लाल रुमाल बांधलेली महिला. तिच्या डोळ्यात जळजळीत राग दिसायचा. तिच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर चांगल्या चांगल्यांची पळापळ व्हायची. त्या वाघिणीची डरकाळीही उरात धडकी भरवणारी असायची. ‘निकलो बाहर सालों, मै आयी हूँ’. मात्र आज ती नाही आणि तिची डरकाळीही नाही. बॅन्डिट क्वीन फुलनदेवीची 10 ऑगस्ट रोजी जयंती आहे. आपल्याला सवय झाली आहे ती व्यक्तीच्या चढत्या आलेखाकडे मानमोडेपर्यंत पाहाण्याची, झोका खाली आल्यानंतर मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष्य करतो. आज अशाच दोन दुर्लक्षित महिलांवर divyamarathi.com प्रकाशझोत टाकत आहे.


  काय करत आहेत फूलनदेवीच्या आई-बहिण?
  मुलादेवी आणि रामकली या मायलेकी. एकेकाळची बॅन्डिट क्वीन फुलनदेवीची आई आणि बहिन. खरं वाटत नाही ना, एखाद्या माजी खासदाराचे कुटुंब असेही राहात असेल म्हणून. मात्र हे खरे आहे. फुलनदेवीची आई आणि बहिन दोनवेळच्या अन्नालाही पारख्या झाल्या आहेत. मुलादेवी आणि त्यांची 50 वर्षांहून मोठी मुलगी रामकली या दोघी उत्तरप्रदेशातील यमुनेच्या तीरावर वसलेल्या काल्पी या जालौन जिल्ह्याच्या छोट्या तालुक्यातील शेखपुरगुढा या गावात एकाकी आयुष्य जगत आहेत. यांच्या घराची अवस्था पाहूनच आज यांची आर्थिक स्थिती कशी असेल याचा अंदाज येतो.


  पुढील स्लाइड्सवर वाचा
  > काय करते फुलनदेवीची आई...
  > आत्मसमर्पण करताना ठेवल्या होत्या अटी...
  > रामकलीच्या हातात बंदूक आली तर...

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  येणाऱ्या-जाणाऱ्यांसमोर हात पसरवते फुलनची आई 

  रोज रोजंदारीच्या कामाच्या शोधात जायचे आणि काम नाही मिळाले तर हात हलवत परत यायचे असा यांचा दिनक्रम आहे. पोट मात्र फार वाईट असते. त्याला भूतकाळ आणि भविष्य काही कळत नाही. त्यामुळेच एकेकाळच्या खासदार आणि डाकुरानी फुलनदेवीची आई आता तिच्या पश्च्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांसमोर हात पसरत आहे. फुलनदेवी ह्यात होती तेव्हा तिच्या एका इशाऱ्यावर घरात धान्याचे पोते येऊन पडायचे. आता रिकामे डबे तेवढे या आठवणी सांगतात. 

  बीपीएल कार्ड मिळावे म्हणून या मायलेकी तहसिलदाराकडे चकरा मारतात. मात्र त्यांचे उत्तर ठरलेले. तुम्ही तर खासदार फुलनदेवीच्या आई आणि बहिन. तुम्हाला कार्ड कसे मिळेल. ज्या पक्षाच्या तिकीटावर फुलनवेदी संसदेत गेल्या होत्या त्या समाजवादी पक्षाची आता राज्यात सत्ता आहे. मात्र तरीही या मायलेकींची ही अवस्था आहे. 


  पुढील स्लाइडमध्ये, कोणत्या अटीवर केले होते आत्मसमर्पण 

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  मध्यप्रदेश सरकारसमोर आत्मसमर्पण 

  उत्तर प्रदेश पोलिस हात धुवून मागे लागले तेव्हा मध्यप्रदेश सरकारसमोर फुलनने आत्मसमर्पण केले होते. तेही स्वतःच्या अटींवर. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्याकडून फुलनदेवीने कबुल करुन घेतले होते, की तुरुंगात गेल्यानंतर माझ्या घरच्यांना पूर्ण संरक्षण, त्यांना कसायला जमीन, आणि माझ्या समाजातील मुलांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे...

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  रामकलीच्या हातात बंदूक आली तर... 

  आज अशी स्थिती आहे की तिच्या आई आणि बहिणीचीच चूल पेटत नाही.  त्यांची शेतजमीन नातेवाईकांनी बळकावली आहे. पेन्शन बंद झाले. बीपीएल कार्ड मिळत नाही म्हणून स्वस्त धान्यही नाही. याच व्यवस्थेची बळी फुलन झाली होती आणि त्याच्या हातात बंदूक आली होती. पन्नाशी पार केलेल्या रामकलीच्या हातात आता बंदूक येणार नसली तरी तिच्या डोळ्यात तोच राग आहे जो फुलनच्या होता. 

  संदर्भ - दिव्य मराठी - 'रसिक' 
  फोटो सौजन्य - प्रशांत पवार

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  फूलनच्या हयातीतच केला सुनिताशी विवाह

  - फूलन देवी हयातीत असताना आपला पैसा कधीही स्वतःच्या खात्यामध्ये जमा करत नव्हत्या. त्यांच्या बहिण मुन्नी यांनी सांगितल्याप्रमाणे, फूलनदेवीच्या नावे बँक खाते नव्हते. त्या आपला सर्व पैसा पती उमेद सिंहच्या खात्यात जमा करत होत्या.
  - त्यावेळी फूलन देवी यांना एका निधीतून 50 लाख रुपये मिळाले होते. ती रक्कम फूलन यांनी उमेद सिंहच्या खात्यात जमा केली. दुसऱ्या दिवशी बँकेकडून पत्र पाठवण्यात आले. त्यावर लिहिले होते, की तुमच्या खात्यात जमा असलेल्या पैश्यांचा व्याज सुनिता सिंह या महिलेच्या खात्यात जमा होणार आहे. ही बँकेची चूक नव्हती. प्रत्यक्षात सुनिता सिंह उमेद सिंहची पत्नी होती. 

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  काँग्रेस नेते, पेट्रोल पंप मालक
  - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, उमेद सिंहकडे 10 कोटींची मालमत्ता आहे. या प्रतिज्ञापत्रात पत्नीचाही उल्लेख आहे. पण, त्यांनी पत्नीचे नाव लिहिले नाही. यासोबतच दोन जण आपल्यावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
  - उमेद यांचा दिल्लीतील द्वारिका येथे पेट्रोल पंप आहे. यात त्यांच्या पत्नीचा 13 टक्के वाटा आहे. दिल्लीच्या ककरौला गावात त्यांची दोन वडिलोपार्जित घरे आहेत. त्यांची किंमत किमान 4.5 कोटी रुपये आहे. त्यांच्या पत्नीचे दिल्लीतील सीआर पार्कमध्ये 1.6 कोटींचे फ्लॅट आहे. 
  - 2014 च्या माहितीनुसार, त्यांच्या घरात 4 कार होत्या. यात 9.5 लाखांची पजेरो आणि 11.3 लाखांच्या महिंद्रा XUV चा समावेश आहे. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये ते पुन्हा काँग्रेससोबत गेले. 

 • Phoolan Devi Aka Bandit Queen Special Story On Her Birth Anniversary

  फुलनदेवीने 22 ठाकूरांना एका रांगेत उभे करुन त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर लहान-लहान मुलांनाही फुलनदेवी माहित झाली होती.

Trending