आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली कादंबरीवर आधारित 'फूलमणी'मध्ये अर्जुन रामपाल, झारखंडच्या दाट जंगलात होईल शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन रामपालच्या मागील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले नाही. आता त्याचा आगामी चित्रपट 'फूलमणी' आहे. तो बंगाली कादंबर 'फूलमणी उपाख्यान' वर आधारित आहे. हा चित्रपट सूरज बडजात्याचा सहदिग्दर्शक राहिलेला सौरभ चक्रवर्ती बनवणार आहे. चित्रपटाची प्रॉडक्शन डिझायनर बोइशाली सिन्हाने याविषयी माहिती दिली. 


अर्जुन पहिल्यांदाच एखाद्या कादंबरीवर आाधरित चित्रपटात काम करतो आहे. यात अर्जुन दगडापासून मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात नीरज काबी, व्हिक्टर बॅनर्जी आणि अक्षय ओबेरॉयसारखे कलाकार आहेत. नीरज काबी नुकताच 'सॅक्रेड गेम्स' आणि 'वन्स अगेन' सारख्या वेब शोजमध्ये दिसला होता. यात अर्जुनच्या अपोझिट 'लॉयन' फेम अॅक्ट्रेस प्रियंका बोस दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे शूटिंग झारखंडच्या दाट जंगलात केले जाईल. कारण चित्रपटाची नायिका आदिवासी आहे. ती ज्या जंगलात राहते तेथे एक दिवस अर्जुन रामपालचे पात्र पोहोचते. आदिवासी लोकांच्या जमिनीवर शहरी बिल्डरने कशी लूट माजवली हे यात दाखवण्यात आले आहे. यावरच चित्रपट आधारित आहे. 


बोइशालीने पुढे सांगितले, 'हा चित्रपट सामान्य जनता नव्हे तर एका खास वर्गाला ध्यानात ठेवून बनवण्यात आला आहे. यात पेंटिंग आणि स्कल्प्चरचे तंत्रज्ञान आणि बारकावे सांगण्यात आले आहेत. आर्ट चित्रपटासाखा हा चित्रपट असेल. त्यासाठी आर्ट चित्रपटाची समज असणाऱ्या निर्मात्याशी चर्चा सुरू झाली आहे. चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. तरीदेखील दिग्दर्शक संतुष्ट नसला तर याचे रुपातंरण वेब सिरीजमध्ये करण्यात येईल. यावर नेटफ्लिक्सनेदेखील आपली सहमती दर्शवली आहे. 

बातम्या आणखी आहेत...