आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- मराठी अभिनेता मंदार कुलकर्णी याला फोटोशूटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मंदारने ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ 'शेजारी-शेजारी पक्के शेजारी' यासारख्या मालिकेत काम केले आहे.
मंदारने बिकिनी फोटोशूट करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित मुलीने केलाय. पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार दाखल केली होती. मंदार आणि तक्रारदार तरुणीची जानेवारी महिन्यात एका नाट्य शिबीरात भेट झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मंदारने तिला टीव्ही मालिकेच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करायचे आहे, असे सांगून आपल्या घरी बोलावले.
तरुणी घरी आल्यानंतर काही कपड्यांवर फोटोशूट झाल्यानंतर मंदारने तिला बिकिनी घालण्यासाठी दिली. पण बिकिनीत फोटोशूट करण्यास आपण कम्फर्टेबल नसल्याचे सांगत तिने नकार दिला. त्यानंतर मंदारने आपल्याला जबरदस्ती अर्धनग्नावस्थेत फोटोशूट करण्यास भाग पाडले आणि विनयभंग केला, तसेच कोणाला सांगू नकोस अशी धमकीही दिल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे.
मंदारच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने मंदार कुलकर्णीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम 345 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केले. 34 वर्षीय मंदार कुलकर्णी पुण्यातील शनिवार पेठेत राहतो. त्याने राधा प्रेम रंगी रंगली, आम्ही दोघं राजा राणी, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा मालिकांमध्ये भूमिका साकारली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.