आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो काढण्याच्या नादात सिंहगडावरुन अडीचशे फूट दरीत कोसळलेल्या युवकाची गिरीप्रेमी रेस्क्यू टीमने केली सुटका

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मित्रांना फोन केल्यानंतर प्रविण बेशुद्ध पडला

पुणे- नागपूर येथील रहिवासी व सध्या पुण्यात टेक महिंद्रा कंपनीत नोकरी करत असलेल्या 28 वर्षीय प्रविण ठाकरे यांचा सिंहगड किल्ल्यावर शुक्रवार (दि.10 जानेवारी 2020) रोजी यशस्वी रेस्क्यु करण्यात गिरिप्रेमीच्या संघाला यश आले. 



ठाकरे गुरुवारी दुपारी एकटाच सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. संध्याकाळी सूर्यास्ताचा फोटो घेताना ठाकरे 200-250 फूट दरीत कोसळला. किल्ल्यावरील राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागे एमटीडीसी जवळील कड्यावरून तो खाली कोसळला. संपूर्ण रात्र तो जखमी अवस्थेत दरीतच पडून होता. रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानंतर अखेर प्रविणला वाचवण्यात यश आले.



याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रविण ठाकरे गुरुवारी दुपारी एकटाच सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. संध्याकाळी सूर्यास्ताचा फोटो घेताना ठाकरे 200-250 फूट दरीत कोसळला. किल्ल्यावरील राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागे एमटीडीसी जवळील कड्यावरून तो खाली कोसळला. संपूर्ण रात्र तो जखमी अवस्थेत दरीतच पडून होता. त्यानंतर त्याने आपल्या नागपूरच्या मित्रांना फोनकरून अपघाताबद्दल कळविले होते, पण ठाकरे बेशुद्ध अवस्थेत गेल्याने पुढील संपर्क करू शकला नाही. त्याचे मित्र सकाळी पुण्यात पोहोचल्यावर सकाळी 10.22 च्या सुमारास एमएमआरसीसीच्या हेल्पलाईनवर रेस्क्यूसाठी संपर्क साधण्यात आला.



त्यावेळी गिरिप्रेमीची टीम गडावरच कार्यरत होती, त्यांना रेस्क्यूबद्दल कळविण्यात आले. गिरिप्रेमीच्या सिद्धार्थ जाधव, अतुल मुरमुरे, स्थानिक नागरिक सांगळे व नामदेव कोंडके , समृद्धी सपकाळ, नंदू जोरकर, आणि विकास जोरकर या सगळ्यांनी दरीत उतरून ठाकरे यांना सुखरूप गडावर घेऊन आले. दरम्यान रुग्णवाहिका गडावर उपलब्ध करण्यात आली व सकाळी 11 च्या सुमारास प्रविण ठाकरे यांना आपल्या मित्रांच्या स्वाधीन करून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले व पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. ठाकरे यांचा हात फ्रॅक्चर असून मणक्याला इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शक्य तेवढ्या लवकर मदत पोहोचल्याने ठाकरे यांच्या जीवावरील धोका टळला आहे.