आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्यूनस आयर्स - सोशल मीडियावर सध्या एका पोलिस महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महिला पोलिस अधिकारी गणवेशात बाळाला दूध पाजताना दिसत आहे. हा फोटो अर्जेंटिनाच्या एका हॉस्पिटलचा आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर या पोलिस अधिकारी महिलेचे कौतुक होत आहे.
ऑन ड्यूटी होती पोलिस महिला
मीडिया रिपोर्ट्सनुसार या पोलिस अधिकारी महिलेचे नाव सेलेस्ट अयला आहे. ती बियॉन्स एअर्सच्या सोर मारिया लुदोलविका चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये काम करत होती. अचानक तिने एक बाळ जोरात रडत असल्याचे ऐकले. एका रूममध्ये रडणाऱ्या एका नवजात बाळाचा तो आवाज होता. डॉक्टर इतर मुलांच्या उपचारात बिझी असल्याचे या महिलेने पाहिले. त्यामुळे तिने बाळाला शांत करण्यासाठी आणि त्याला खाऊ घालण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली. त्यानंतर अयलाने त्या बाळाला शांत करण्याचा बराच प्रयत्न केला पण ते बाळ खूप उपाशी होते, त्यामुळे तिने स्वतः त्याला दूध पाजण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते बाळ लगेचच शांत झाले. या बाळाची आई आजारी होती आणि तिची काळजी घेणारे कोणी नव्हते असे सांगितले जात आहे.
काय म्हणाली अयला..
अयला म्हणाली, मी या बाळाला पाहिले तेव्हा ते फारच उपाशी असल्याचे माझ्या लक्षात आले. मी लगेचच त्या बाळाला जवळ घेतले आणि दूध पाजले. लहान मुलांच्या मुद्दयावर समाजाने अधिक संवेदनशील असण्याची गरज आहे असे ती म्हणाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.