आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दिवसांपासून मृत पिलाबरोबर फिरतोय हा व्हेल मासा, जगभरामध्ये व्हायरल होत आहे Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - येथे एक व्हेल मासा 17 दिवसांपासून त्याच्या नवजात मृत पिलाला घेऊन फिरत असल्याचे समोर आले आहे. या माशाचा फोटो सध्या जगभरात व्हायरल झाला आहे. समुद्रातील प्राण्यांचा अभ्यास करणारे मायकल मिलस्टीन यांचे म्हणणे आहे की, काही संशोधकांनी बुधवारी 20 वर्षांच्या एका व्हेलला वॉशिंग्टन ऑलिम्पिक पेनिन्सुला जवळ त्याच्या मृत पिलासह फिरताना पाहिले. व्हेलच्या या पिलाचा मृत्यू 24 जुलैला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आणखी एका व्हेलचे पिलू आजारी असल्याची माहिती मिळाली असून उपचारासाठी त्याचा शोध घेण्यात येत आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...