• Home
  • News
  • Photo shared by Sarah Ali Khan on Instagram, called herself, cheap copy of Rekhaji

सोशल मीडिया / सारा अली खानने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, स्वतःला म्हणाली रेखाजींची स्वस्त कॉपी

वरुण धवनने यावर कमेंट करून साराला लगावला टोला 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 12,2019 02:13:05 PM IST

बॉलिवूड डेस्क : सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विशेषतः इंस्टाग्रामवर सारा नेहमी आपले चित्रपट आणि पर्सनल लाइफशी निगडित अपडेट्स शेअर करत असते. अशातच तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत आणि स्वतःला रेखाजींची स्वस्त कॉपी म्हणाली आहे. साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये एक फनी शायरीदेखील लिहिली आहे. साराने लिहिले, 'इन आंखों की मस्ती, रेखा जी से है सारा बहुत सस्ती, वो अपने आप पे ही हंसती, यह सब कहकर वो फिर खुद फंसती. #sarakishayari'

वरुण धवनने केली यावर कमेंट...

साराच्या या फनी शायरीवर वरुण धवनने कमेंट करून लिहिले, 'मला वाटते तुझ्याकडे खूप रिकामा वेळ आहे'

'कुली नंबर 1' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे सारा...

सारा सध्या गोविंदा-करिश्मा कपूर यांचा चित्रपट 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये काम करत आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. सारा यामध्ये वरुण धवनच्या अपोजिट दिसणार आहे. 2018 मध्ये 'केदारनाथ' ने डेब्यू करणाऱ्या साराला अशातच स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे.

X
COMMENT