आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने कॅमेर्‍यात टिपले ट्रान्सजेंडर कपलचे लव्ह मुव्हमेंट्‍स, पाहा विवाहानंतरचे खास क्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ट्रान्सजेंडर हा तसा लोकांच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नसणारा असा विषय आहे. पण गेल्यावर्षी फोटोग्राफर अनु पटनायक हिने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचा पती जय शर्मा यांच्या माध्यमातून ट्रान्सजेंडरचे जग कसे असते हे सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ट्रान्सजेंडरची लव्ह लाइफ कशी असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. यात त्यांच्या जीवनातील खास क्षणांना त्यांनी कॅमेर्‍यात टिपले होते. ट्रान्सजेंडर असल्याचे खुलेपणे जाहीर करणारे माधुरी आणि जय हे पहिले कपल आहे. त्यांचे हे फोटोशूट वर्षभरापूर्वीचे असले तरी सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

कपलसोबत घालवले काही दिवस...
- एक वेब पोर्टलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अनु यांनी सांगितले की, या कपला पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत काही दिवस राहाण्याचा निर्णय घेतला होता.
- अनुला त्यांचे अंतरंग कॅमेर्‍यात टिपण्याची इच्छा होती. प्रेमाला कुठल्याही मर्यादा नसतात, हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचे होते.
- माधुरीचे सध्या ट्रान्सजेंडर मॅरिज सर्टीफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

'फेसबुक' झाली होती भेट...
- जय आणि माधुरी फेसबुकवर भेटले होते. दोन वर्षांनी दोघे हिंदु धर्मानुसार विवाहाच्या बंधनात अ‍डकले.
- यादरम्यान, सुप्रीम कोर्टद्वारा ट्रान्सजेंडरला तिसर्‍या जेंडरच्या रूपात मान्यता देण्याचा निर्णय आला होता. मात्र, ट्रान्सजेंडरच्या विवाहाबाबत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले नाही.
- माधुरी हिने सांगिते की, जयसोबत ती मागील पाच वर्षांपासून राहात आहे. आमच्या विवाहाला कायद्यानुसार मान्यता मिळायला हवी. मात्र, ती ही एक कठीण प्रक्रिया आहे. पण, मी पराभव मानणारी नाही. मॅरेज सर्टिफिकेट मिळवून दाखवेल.

 

कोण आहे अनु पटनायक? 
- अनु पटनायक ही एक फ्रीलान्स फोटोग्राफर आहे. ती मुंबईत राहाते.
- बॉलिवूडमधील अनेक मूव्हीजसाठी तिने स्टिल फोटोग्राफी केली आहे.

पुढील स्लाइड्स पाहा, ट्रान्सजेंडर कपलचे लव्ह मुव्हमेंट्‍स...

 

(टीप: सर्व फोटो अनु पटनायक यांच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यात आली आहेत.)

बातम्या आणखी आहेत...