Home | Khabrein Jara Hat Ke | Photographer, Simon Dell, he gives them fruits, catching the mouse

फोटोग्राफरने उंदरांसाठी बनवले घर, आज 9 खोल्यात राहते उंदराचे कुटुंब

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 04:27 PM IST

फोटोग्राफर सायमन उंदरांच्या कुटुंबाला मक्का, जामुन, सफरचंद आणि शेंगदाणे खाऊ घालतात

 • Photographer, Simon Dell, he gives them fruits, catching the mouse

  लंडन- आज प्रत्येक जण फक्त स्वतःच्या भल्यासाठी जगत असतो. पण जगात काही असेही लोक आहेत जे दुसऱ्यांचा विचार करतात. ब्रिटनचे प्रसिद्ध वाइल्ड लाइफ फोटोग्राफर सायमन डेल यांनी आपल्या बागीच्यामध्ये एका कोपऱ्यात उंदरांसाठी छोटेसे घर बनवले आहे. तसेच, त्यांनी उंदरांसाठी खाण्या पिण्याच्या सर्व गोष्टी तिथे उपलब्ध केल्या आहेत.

  घर बनवून सुरक्षित ठेवले
  डेल यांनी सांगितले की, "त्यांनी काही दिवसापूर्वी घराच्या मागे असलेल्या बागीच्याला सुशोभित करण्याचे काम सुरू केले होते. यादरम्यान एक उंदिर वारंवार त्यांच्याकडे बघत होता, कारण एक मांजर त्याची शिकार करण्यासाठी त्याच्या बाजूलाच ऊभी होती. त्यामुळे डेलला वाटले की, ही मांजर उंदराला खाऊन टाकेल. त्यामुळे त्यांनी घरातून एक बॉक्स आणला आणि जमिनीत फिट करून त्याला तारेचे कुंपन केले.

  डेलने त्या उंदराचे नाव जॉर्ज असे ठेवले आहे. आता तो उंदिर त्यांच्या घरात वावरत असून त्याच्यासोबत अनेक उंदिर तिथे जमा झाले आहेत. डेलने त्यांचे कुटुंब वाढत असल्यामुळे आणखी काही रूम वाढवल्या. या सर्व रूम्स आतून एकमेकांशी जोडलेल्या आहेत. यादरम्यान उंदरांची संख्या वाढल्यामुळे डेल यांनी उंदरांसाठी एक छोटेशे गावच तयार केले. त्यामुळे आता नऊ उंदरांचे कुटुंबात तिथे वास्तव्य करत आहे. तसेच, खाण्यासाठी उंदराच्या घराजवळ मक्का, जामुन, सफरचंद, शेंगदाणे यासारखे अनेक पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

  डेल यांनी सांगितले की, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असल्यामुळे त्यांना प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. त्यासाठी ते आपल्या कॅमेऱ्याची लेंस झुम करून उंदरांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतात. जेवण करून जेव्हा हे सर्व उंदिर आपल्या घरात जातात, तेव्हा कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसण्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Trending