आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व कायद्याच्या विरोध प्रदर्शनादरम्यान तोडफोड करणाऱ्या 57 जणांचे फोटो होर्डिंगवर लावले, सरकार आता त्यांच्याकडून 88 लाख रुपये वसूल करणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लखनऊच्या ठाकुरगंज, हसनगंज, हजरतगंज आणि केसरबाग भागांमध्ये प्रशासनाने होर्डिंग्स लावले

लखनऊ- नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर 19 डिसेंबरला लखनऊमध्ये झालेल्या प्रदर्शनामध्ये सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या 57 जणांचे फोटो त्यांच्या नाव पट्ट्यासह प्रशासनाने सार्वजनिक केले आहेत. गुरुवारी रात्री हे होर्डिंग त्या भागांमध्ये लावले, जिथे त्यांनी तोडफोड केली होती. डीएम अभिषेक प्रकाश म्हणाले की, जर ठरलेल्या वेळी यांनी दंड भरला नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रशासनाने हसनगंज, हजरतगंज, केसरबाग आणि ठाकुरगंज भागांमध्ये 57 जणांना 88,62,537 रुपये वसूलण्याबद्दल सांगितले आहे. 

150 पेक्षा जास्त लोकांना नोटिस दिल्या आहेत... 

19 डिंसेबरला शुक्रवारच्या नमाजनंतर लखनऊच्या चार स्टेशन भागात हिंसाचार पेटला होता. यामध्ये ठाकुरगंज, हजरतगंज, केसरबाग आणि हसनगंजचे नाव सामील आहे. तोडफोड करणाऱ्यांनी या भागामध्ये खाजगी वाहने जाळली होती. राज्य सरकारने नुकसान भरपाई यांच्याकडून करून घेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी फोटो-व्हिडिओच्या आधारे 150 पेक्षा जास्त लोकांना नोटिस पाठवल्या आहेत. यांमध्ये तपासानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रशासनने 57 सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे दोषी मिळाले होते. 

यावरून सर्वांना शिकवण मिळेल : डीएम

डीएम अभिषेक प्रकाश म्हणाले - चार स्टेशन भागात एक कोटी 88 लाख 62 हजार 537 रुपयांची रिकव्हरीचे तीन आदेश जारी केले आहेत. पोलिसांनी पुरावे उपलब्ध केल्यानंतर इतरांकडूनही वसुली केली जाईल. सर्वांना नोटिस जारी होण्याच्या तारीखेपासून 30 दिवसांचा वेळ दिला गेला आहे. जर ठराविक कालमर्यादेत शुल्क जमा केले नाही तर संपत्ती सलंग्न केली जाईल. यामुळे इतरांनाही शिकवण मिळेल की, कुणाच्या भडकावण्यात येऊ नये आणि कुणाच्याही संपत्तीचे नुकसान करू नये. नाहीतर त्यांनाच फोटोदेखील सार्वजनिक केला जाईल. 

नुकसान आणि तोडफोड करणाऱ्यांची संख्या.... 

ठिकाण किती नुकसान (रुपयांमध्ये)आंदोलकांची संख्या
हजरतगंज    6437637    28
हसनगंज    2176000    13
कैसरबाग    175000    06
ठाकुरगंज73900    10

बातम्या आणखी आहेत...