आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये लावू नयेत वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मूर्ती आणि फोटो लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसार समरांगणसूत्रधार, प्रासाद मण्डन आणि वृहत्संहितासारख्या वास्तू ग्रंथांमध्ये घराची सजावट आणि इतर गोष्टींविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. या ग्रंथांनुसार घरामध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू आणि फोटोंचा शुभ-अशुभ प्रभाव तेथे राहणाऱ्या लोकांवर पडतो. यामुळे या ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याप्रकाराची मूर्ती आणि फोटो घरामध्ये ठेवू नयेत.


प्राण्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि पौराणिक फोटोंविषयीसुद्धा बाळगावी सावधानी 
समरांगण सूत्रधारच्या 38 व्या अध्यायामध्ये सांगितले आहे की गिधाड, घुबड, कबुतर, कावळा, घार यांसारख्या पक्ष्यांचे फोटो किंवा चित्र भिंतींवर लावू नयेत.


- साप आणि मगर यासारखे फोटो, आकृती आणि यांच्यासारख्या आकार-प्रकारच्या गोष्टी घरात ठेवल्याने दोष लागतो.


- डुक्कर, माकड, उंट तसेच इतर जंगली प्राणी उदा. सिंह, बिबट्या, मांजर यासारख्या मांसभक्षी प्राण्यांचे चित्र घरामध्ये असू नयेत.


- रामायण आणि महाभारतासहित कोणत्याही प्रकारचे युद्ध चित्र घरामध्ये असणे शुभ मानले जात नाही. यासोबतच इतिहास आणि पुराणांमध्ये सांगण्यात आलेल्या कथांच्या पात्रांचे चित्र घरामध्ये असू नयेत.


- रडणारे मनुष्य, राक्षस आणि भूत-प्रेतांचे विचित्र चित्रही घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...