आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photos Of Kangana From The Set Of Film 'Thalaivi', Kangana Seen Doing Bharatanatyam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'थलायवीच्या' च्या सेटवरून समोर आले कंगनाचे फोटो, भरतनाट्यम करताना दिसली कंगना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोटचा आगामी चित्रपट 'थलायवी' चे शूटिंग सध्या चेन्नईमध्ये सुरु आहेत. चित्रपटाच्या सेटवर भरतनाट्य सीक्वेंस शूट केला जात होता. याच सीक्वेंसमधून कंगनाचा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती भरतनाट्यमच्या स्टेप करताना दिसत आहे. जयललिता यांचा बायोपिक 26 जूनला रिलीज होत आहे. 

अशातच रिलीज झालेला चित्रपट 'पंगा' ची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीदेखील चेन्नईला पोहोचली. जिथे ती कंगनाला भेटली. या भेटीचा फोटो अश्विनीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. या पोस्टसोबत तिने कंगनाचे कौतुक करत लिहिले, "माझ्या या मेहनती मैत्रिणीला आलिंगन देण्याची इच्छा होत होती, यामुळे मी सरप्राइज देण्यासाठी चेन्नईला आले. आपल्या जया/थलायवीसोबत बोलण्याचे सत्र सुरु आहे." 

थलायवीसाठी कंगनाने मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून शूटिंग सुरू केले आहे. चित्रपटाचे प्रोडक्शन विष्णु इंदुरी करत आहेत. तर दिग्दर्शन एल विजयचे आहे. चित्रपटात कंगना रनोट टायटल रोल निभावणार आहे. तीन भाषणामध्ये बनत असलेल्या या चित्रपटासाठी कंगनाने भरतनाट्यम आणि तमिळ भाषेचे क्लासदेखील घेतले आहेत. 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. जयललिता यांचा एमजीआर यांच्यासोबतचा पहिला चित्रपट 'आइराथिल ओरुवन' होता. जो 1965 मध्ये आला होता. त्यांना राजकारणात आणण्यातही एमजीआर यांची महत्वाची भूमिका होती. चित्रपटात हा रोल अरविंद स्वामी साकारत आहेत.