आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दरबार' च्या सेटवरून लीक झाले रजनीकांतचे फोटो, 25 वर्षांनंतर या अवतारात दिसणार सुपरस्टार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ए.आर मुरुगादौस यांच्या 'दरबार' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. आपल्या स्टाइलने पडद्यावर राज्य करणारा रजनीकांत 25 वर्षांनंतर खाकीत दिसणार आहे. 'दरबार'च्या सेटवरून रजनीकांतचे काही फोटो लीक झाले. त्याच्या गेटअपबाबत चाहत्यांमध्ये उत्साह आहे. हे फोटो पाहिल्यानंतर रजनीकांतने वयाची साठी पार केली यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. 

 

मुंबईत सुरु आहे शुटिंग

कॉलीवुड स्ट्रीट नावाच्या ट्विटर हँडलवर हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत. एका फोटो रजनी कारचा दरवाजा उघडून बाहेर येताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटो तो सॅल्युट करत अभिवादन करत आहे. सध्या चित्रपटाचे शेवटे शेड्यूल मुंबईत सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे. 

 

 

ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार फिल्म

'दरबार'मध्ये रजनीकांतसोबत नयनतारा, सुनील शेट्टी आणि प्रतिक बब्बर यांच्या मुख्य भूमिका आहेत. एप्रिल महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. पुढच्या वर्षी पोंगर उत्सवादरम्यान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

या चि्त्रपटात केली होती पोलिसाची भूमिका
रजनीकांतने 2000 मध्ये शेवटचा हिंदी सिनेमा केला होता. 1991 मध्ये आलेल्या फूल बने अंगारेमध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली होती. पण या चित्रपटात त्याची भूमिका मोठी नव्हती. या चित्रपटात रेखाचे पात्र महत्वाचे दाखवण्यात आले होते.