आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आणि योगींच्या फोटोला जीवंतपणीच घातले पुष्पहार, सोशल मीडियावर व्हायरल फोटोची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखाद्या फोटोवर फुलांचा हार कधी चढवला जातो हे सर्वांनाच माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या फोटोला जीवंतपणीच हार घातला तर.. त्यातही ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री असेल तर. सहाजिकच कोणाकडून तरी चुकून हा प्रकार घडलेला असणार हे नक्की. सोशल मीडियावर सध्या अशाच एका फोटोमुळे खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोला फुलांचे हार घातलेले दिसत आहेत. 


या फोटोतील खोलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेजकर, महात्मा गांधी अशा महापुरुषांचे फोटो एका बाजुला लावलेले आहेत. तर दुसऱ्या बाजुला मोदी, योगी अशा नेत्यांचे फोटो आहेत. यात आंबेडकर आणि गांधीजींच्या फोटोबरोबरच योगी आणि मोदींच्या फोटोलाली फुलांच्या माळा घातलेल्या दिसत आहेत. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोटो बुलंदशहर येथील नगर परिषद कार्यालयातील आहे. 15 ऑगस्टला येथे एका कार्यक्रमादरम्यान हा फोटो काढला होता अशी माहिती मिळाली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या फोटोवरील हार काढल्याचे समोर आले. 

 

बातम्या आणखी आहेत...