Home | National | Madhya Pradesh | physical abuse of minor after kidnap video viral

भर बाजारातून मुलीला फरफटत घेऊन गेले तीन तरुण, 100 मीटर अंतरावर होते पोलीस स्टेशन

नॅशनल डेस्क | Update - Sep 05, 2018, 04:10 PM IST

मध्य प्रदेशातील आदिवासी भाग अलिराजापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

  • physical abuse of minor after kidnap video viral

    इंदूर (म.प्र.) - मध्य प्रदेशातील आदिवासी भाग अलिराजापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी मुलीला भर बाजारातून बळजबरी उचलून नेले. हा सर्व प्रकार आजूबाजूचे लोक पाहत होते परंतु कोणीही याचा विरोध केला नाही. अपहरणाच्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवर प्रशचिन्ह लागले आहे.


    - घटना 31 ऑगस्टला सोंडवा तहसील क्षेत्राच्या वालपूर गावात घडली. या प्रकरणात मुलीने तीन मुलांविरुद्ध अपहरण आणि बलात्काराची केस दाखल केली आहे. परंतु एसपी विपुल श्रीवास्तव यांनी सांगितले आहे की, पोलीस प्रकरणाचा तपास करत असून हा व्हिडीओ त्याच घटनेचा आहे की नाही याचा शोध घेत आहे.


    - 17 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तीन मुले या मुलीला ओढत घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ते ज्या ठिकाणाहून निघाले आहेत तेथून पोलीस स्टेशन फक्त 100 मीटर दूर आहे. परंतु कोणीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची सूचना दिली नाही. यासोबतच मुलगी मोठमोठ्या ओरडत असूनही पोलिसांना याविषयी काहीही माहिती नाही.

  • physical abuse of minor after kidnap video viral

Trending