आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Physical Education As Well As Security Education In Schools Important

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शारीरिक शिक्षणाबरोबरच शाळांमध्ये सुरक्षा शिक्षण गरजेचे

एका वर्षापूर्वीलेखक: एन. रघुरामन
  • कॉपी लिंक

रविवारी मी एका बांधकाम सुरू असलेल्या शाळेत गेलो होतो. तेथे प्रोजेक्टर आणि अन्य विद्युत उपकरणे चालू करण्यासाठी एक इलेक्ट्रिक प्लग पॉइंटही पाहिला, जो पाच फूट उंचावर लावला होता. मी याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, मुले यात हेअर पिन घालू शकतात. तेव्हा काँट्रॅक्टर मला हसला आणि म्हणाला, ‘सर, असं असेल तर मुलांना आपण जे शिक्षण देतो त्याचा काय फायदा? असला मूर्खपणा कोणी करू नये हा तर या शिक्षणाचा उद्देश आहे ना.’ त्याच्या या उत्तरावर मी जेव्हा रागाने पाहिले तेव्हा त्याने गप्प बसणे पसंत केले. पण मॅनेजमेंटला माझी चिंता समजली आणि सर्व शाळेत मुलांचे हात जेथे पोहोचणार नाहीत, अशा ठिकाणी हे प्लग बसवले. हे पाहून मला समाधान वाटले. सायंकाळी मुंबईच्या एका मार्केटमध्ये फिरताना मी एका वडिलांना त्यांच्या मुलीसह तोंडावर मास्क लावून भाजी खरेदी करताना पाहिले. त्यांना असे खरेदी करताना पाहून लोकांना संशय येत होता की, त्यांना काहीतरी झाले आहे. काही जणांनी हसून त्यांची खिल्लीही उडवली. लोकांच्या या प्रतिक्रिया पाहून त्यांना हसू येत होते. कारण लोकांना स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा समोर येणाऱ्या बाधित लोकांपासून स्वत:ला वाचवणे जास्त चांगले. तेव्हा या मुलांना त्यांनी मास्क का वापरला याचे कारण सांगितले तेव्हा ही मुले तोंडावर हात ठेवून पळून गेली. तरीही यांना काहीतरी झाले आहे असे समजून बापलेकीला लोकांनी वाट करून दिली. कारण भारतात नॉवेल कोरोना व्हायरसचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी असा रोगी आढळून आल्यानंतर दुसरा पेशंटही केरळचाच आढळला. दुसरा पेशंट हा विद्यार्थी आहे आणि तो २४ जानेवारी रोजी या आजारपणाचे केंद्र असलेल्या वुहानहून परतला होता आणि कोणाला त्याबद्दल काही माहिती नव्हती. चीनने या महामारीपासून वाचण्यासाठी उपायांना वेग दिला आहे. महामारीचे केंद्र वुहानचा ४४ वर्षीय चिनी व्यक्ती फिलिपाइन्सला गेला होता आणि शनिवारी मनिला येथे त्याचा मृत्यू झाला. चीनने आणखी एका शहराची नाकेबंदी केली आहे. मृतांची संख्या ३०४ झाली असून २५९० नवे रुग्ण समोर आले आहेत. बाधितांची एकूण संख्या १४ हजार ३८० झाली आहे. अमेरिकेत आठ बाधित आढळले असून अनेक देशांनी चीनला जाण्यास प्रतिबंध घातलेले आहेत. उबर कंपनीने केलेले सुरक्षा उपायही पाहण्यासारखे आहेत. मेक्सिकोमध्ये कोरोना व्हायरस असण्याची शंका असलेल्या ज्या प्रवाशांना बसवले होते, अशा ड्रायव्हर्सशी संपर्क आलेल्या २४० युजर्सचे अकाउंट बरखास्त केले. कारण उबर कंपनीला हे समजले होते की, कोरोना व्हायरसबाधित दोन व्यक्तींना दोन ड्रायव्हर्सनी टॅक्सीत बसवले होते. त्यानंतर २४० प्रवासीही बसवले होते. त्यामुळे या २४० जणांचे अकाउंट तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले. संशोधन सांगते की, सुरक्षिततेबाबत जागरूकता असेल तर मुलांना होणाऱ्या ५० टक्के जखमा बऱ्या होतात. पण चारही बाजूला धोका असताना आमच्या देशातील शाळांच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरक्षेबाबत शिक्षण ही संकल्पनाच शिकवली जात नाही. आपल्या रोजच्या जीवनात मुलांनी सुरक्षा उपायांना प्राधान्य दिले पाहिजे. शाळांमध्येही सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजूषा, पोस्टर-मेकिंग स्पर्धा आणि चित्रपट असे उपाय केले जावेत. फंडा असा : शाळांमध्ये शारीरिक शिक्षण (पीटी) गरजेचे आहे, पण सुरक्षा शिक्षणही (एसटी) तेवढेच गरजेचे आहे. लठ्ठपणाच्या समस्येप्रमाणे नवे धोकेही वाढत आहेत.