Home | National | Other State | Physical exploitation of 5 year old girl by minor boy in Hoshiarpur Punjab

चॉकलेटचे अमिष दाखवून 15 वर्षीय मुलाने 5 वर्षांच्या चिमुकलीवर केला बलात्कार; रडण्याचा आवाज ऐकून रूमच्या बाहेर लोक जमा झाल्याचे कळताच आधी त्याने मुलीला बाहेर फेकले नंतर हत्त्यार दाखवून पळ काढला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 02:27 PM IST

मुलीने रडत-रडत आईला सांगितली घटना, म्हणाली- भैयाने चॉकलेटसाठी 20 रूपये दिले आणि हात पकडून घरात घेऊन गेला

  • Physical exploitation of 5 year old girl by minor boy in Hoshiarpur Punjab

    होशियारपूर(पंजाब)- होशियारपरमध्ये मंगळवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या 15 वर्षीय मुलाने चॉकलेटसाठी 20 रूपये देऊन 5 वर्षीय मुलीला घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून लोक मुलाच्या रूमच्या बाहेर जमा झाले, ते पाहून मुलाने मुलीला रूमच्या बाहेर फेकले आणि धारदार हत्त्यार दाखवून तेथून पळ काढला. पाठलाग करून लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला पण तो त्यांच्या तावडीतून सुटून पळू गेला.


    लोकांनी रक्ताने माखलेल्या मुलीला रूग्णालयात दाखल केले. बलात्कार आणि जोराने फेकल्यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरण वाढल्यावर मुलाचे आई-वडील आले आणि मुलीच्या आईला 500 रूपयांची नोट देत म्हणाले- हे घे तिच्यावर उपचार कर आणि तोंड बंद कर. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून टाऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकांनी सांगितले की, आरोपीला याआधीदेखील चोरी करताना पकडले आहे.

Trending