आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत बनवले शारीरिक संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार- तालुक्यातील गंधारी येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी २५ वर्षीय युवकाविरूध्द गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. 


गंधारी येथून लोणी स.म. ता. रिसोड जि. वाशिम येथे २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता एकटीच पायी कॉलेजला जात असताना मध्येच गावातीलच नामदेव बळीराम राठोड वय २५ याने तिला एकटी पाहून तुला कॉलेजला गाडीवर सोडतो. म्हणून तिला आपल्या गाडीवर बसवून लग्नाचे आमिष दाखविले. पीडीत मुलीने मला वापस घरी जायचे आहे. मला गाडीच्या खाली उतरू दे ,असे म्हणाली तरी सुद्धा युवकाने आपली दुचाकी भरधाव वेगाने सिंदखेड राजा येथे नेले. त्यानंतर मित्राच्या घरी मोटारसायकल ठेवून बसने पुणे येथे नेले. 


पुणे येथे पोहोचल्यावर मित्राच्या खोलीवर तसेच गोवा येथील हॉटेलवर तिला धमकी देत शारीरिक संबंध स्थापन केले. याबाबतची तक्रार अल्पवयीन मुलीने पोलिसांत दिली. त्यावरून नामदेव बळीराम राठोड यांच्या विरूध्द भांदविच्या विविध कलमांसह सह कलम ४,६बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पो. का. प्रदीप सोनवने, पोहेका. अशोक चाटे करीत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...