Home | International | Other Country | PIA woman flight passenger opens emergency exit door thinking it's toilet in Britain

महिलेने टॉयलेट समजून उघडले विमानाचे इमरजेन्सी गेट; विमान रनवेवर असताना घडली घटना, मग पुढे घडले असे काही...

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 01:29 PM IST

सात उशिराने झाले विमानाचे उड्डाण, सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने केले रवाना

 • PIA woman flight passenger opens emergency exit door thinking it's toilet in Britain

  मॅनचेस्टर - ब्रिटनच्या मॅनचेस्टर विमानतळावर शनिवारी एका महिलेमुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाने 7 तास उशिरा उड्डाण केले. कारण महिलेने टॉयलेट समजून विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला होता.

  पीआयएने सांगितले की, विमान मॅनचेस्टरवरून इस्लामाबादसाठी उड्डाण घेणार होते. विमान पीके 702 रनवे वर असताना एका महिलेने नकळतपणे टॉयलेट समजून आपत्कालीन दरवाजाचे बटन दाबले.

  विमानात होते 40 प्रवाशी
  एअरलाइनने सांगितले की, या विमानात 40 प्रवाशी होते. घडलेल्या घटनेमुळे विमानाचे 7 उशिरा उड्डाण करण्यात आले. मानक व्यवस्थेनुसार प्रवाशांना त्यांच्या समानासह उरविण्यात आले. दरम्यान सर्व प्रवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यानंतर त्यांना दुसऱ्या विमानाने इस्लामाबादला रवाना करण्यात आले.

  तोट्यात आहे पीआयए
  गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान एअरलाइन तोट्यात चालत आहे. पीआयएला तोट्यातून बाहेर काढण्यसाठी पाकिस्तान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एअरलाइनचे चीफ एक्झिक्युटीव्ह एअर मार्शल अर्शद मलिक यांनी घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Trending