आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pickpockets Picked Pockets Of 10 Congress Elected MPs On Pretext Of Taking Selfies With Them

खासदारासोबत सेल्फीचा बहाना करून कापला 10 काँग्रेस नेत्यांचा खिसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर (पंजाब)- फतेहगड साहिब येथून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झालेले कांग्रेस नेते डॉ. अमर सिंह यांच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात खिसेकापूनी उपस्थित अनेक नेत्यांचा खिसा साफ केल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, खिसेकापूंनी नवनिर्वाचित खासदारासोबत सेल्फी घेण्याचा बहाणा करून या कार्यक्रमामध्ये प्रवेश केला होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अमलोह रोडवर असलेल्या सुरजीत बँक्वेट हॉलमध्ये बुधवारी घडली. येथे वेगवेगळ्या भागातील आणि पक्षाचे कार्यकर्ते खासदाराला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. तसेच, आमदार रणदीप काकासहित 10 कांग्रेस नेत्यांचाही खिसा कापला गेला आहे. याव्यतिरिक्त खिसेकापूनी आमदाराच्या पी.एचाही खिसा कापला. प्रकरणाची चौकशी करणारे डीएसपी गुरशेर संधू यांनी सांगितले की, चोरांना ट्रेस केले असून लवकरच सर्व आरोपींना पोलिस अटक करतील.